शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

निवडणूक खर्चाच्या दरपत्रकाने उमेदवारांना घाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 10:37 PM

निवडणूक आयोगाने लोकसभा उमेदवारांसाठी ९० लाखांची खर्च मर्यादा निश्चित केली आहे. विशेष म्हणजे, आयोगाने खर्चाचे दरपत्रकही जारी केले आहे. या दरपत्रकामुळे उमेदवारांना घाम फुटला आहे.

ठळक मुद्देखर्चाची मर्यादा ९० लाख : आयोगाची असणार नजर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : निवडणूक आयोगाने लोकसभा उमेदवारांसाठी ९० लाखांची खर्च मर्यादा निश्चित केली आहे. विशेष म्हणजे, आयोगाने खर्चाचे दरपत्रकही जारी केले आहे. या दरपत्रकामुळे उमेदवारांना घाम फुटला आहे. दरपत्रकात निश्चित केलेल्या दरापेक्षा खर्चाचा आकडा कमी झाल्यास उमेदवारांवर गंडांतर येण्याची शक्यता आहे.देशातील निवडणूक दिवसेंदिवस खर्चिक होत आहे. त्यामुळे आयोगाने उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे. प्रत्यक्षात निश्चित मर्यादेच्या आतच उमेदवारांना खर्च करावा लागणार आहे. त्यातही आयोगाने निश्चित केलेल्या दरानुसारच उमेदवारांना पावत्या जोडाव्या लागणार आहेत. मात्र, अनेक लोकसभा मतदारसंघाची व्याप्ती मोठी असल्याने निश्चित मर्यादेच्या आत खर्च करताना उमेदवारांची दमछाक होणार आहे. विशेष म्हणजे, उमेदवारांच्या खर्चावर आयोगाची करडी नजर राहणार आहे. त्यासाठी स्वतंत्र चार पथके गठित करण्यात आली आहेत. ही पथके उमेदवाराने दिलेला खर्चाचा आकडा बरोबर आहे की नाही, याची खातरजमा करणार आहे.आयोगाने प्रचारासाठी भवनाच्या भाड्यापासून ते साधा हार आणि बुकेच्या खर्चाची मर्यादाही निश्चित केली आहे. भिंतीवरील खर्चाचे दरही निश्चित केले आहे. ढोलताशा आणि रॅलीत सहभागी कार्यकर्त्यांच्या प्रमाणानुसारच खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे. प्रचार मंडपात टाकल्या जाणाऱ्या खुर्च्या, सोफा, टी-टेबल, स्पीच डायस, स्टॅण्ड फॅन, कूलर, शहनाई आणि ढोल वादक, स्टेज, समई, टेबल फ्लॉवर पॉट, स्वागत बोर्ड आदींचे दरही निश्चित करण्यात आले आहे. उमेदवाराच्या कार्यकर्त्यांच्या भोजनाचे दरही निश्चित झाले आहे. त्यातही शाकाहारी आणि मांसाहारी भोजनाचे दर वेगवेगळे ठेवण्यात आले आहे, याशिवाय चहा, नाश्ता, कॉफी, फरसाण आदींचे दरही निश्चित झाले आहे. आधुनिक युगात सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात प्रचार केला जातो. त्यावरही आयोगाची नजर राहणार आहे. मोबाईलवरून पाठविल्या जाणाऱ्या संदेशाचे दरही आयोगाने निश्चित केले आहे. प्रतिसंदेश दहा पैसे ते साडेसात रुपयांपर्यंत दर आकारला जाणार आहे. याशिवाय विविध वृत्तपत्रात दिल्या जाणाऱ्या जाहिरातींचे दरही आयोगाने निश्चित केले आहेत.शहर आणि ग्रामीण भागात लावल्या जाणाऱ्या प्रचार फलकांचे दरही आयोगाने निश्चित केले आहे. या फलकांसाठी प्रति चौरस फुटानुसार दर लावले जाणार आहेत.५० रुपयांचा फेटा अन् २० रुपयांची गादीप्रचार कार्यालयात अथवा प्रचारासाठी वापरल्या जाणाºया गादी आणि चादरीसह कार्यकर्त्यांना बांधल्या जाणाºया फेट्यांचे दरही आयोगाने निश्चित केले आहे. कार्यकर्त्यांच्या डोक्यावर फेटा दिसल्यास ५० रुपये खर्च लावला जाणार आहे. याशिवाय प्रचार मंडपातील गादीसाठी २० रुपये तर रंगीत चादरीसाठी १० रुपयांचे दर निश्चित केले आहे. पांढऱ्या चादरीचे दर १५ रुपये असून लोड आणि खोळीसाठी दहा रुपय दर निश्चित केला आहे. एका सतरंजीसाठी ५० रुपयांचा दर आहे. गालिचासाठी १०० रुपये तर विविध आकारमानाच्या शामियानासाठी ४०० रुपये ते हजार रुपयांचे दर निश्चित करण्यात आले आहे. फायबर खुर्ची आणि व्हीआयपी खुर्च्यांचे दरही ठरविण्यात आले आहेत. याशिवाय विविध वाहनांचे दरही निश्चित झाले आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक