घराचा फेरफार रद्द करा
By Admin | Updated: July 23, 2015 02:11 IST2015-07-23T02:11:08+5:302015-07-23T02:11:08+5:30
सालोड (हिरापूर) ग्रामपंचायत हद्दीतील जिजाबाई तुकाराम पेटकर यांच्या घराचा फेरफार करण्यात आला.

घराचा फेरफार रद्द करा
मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
वर्धा : सालोड (हिरापूर) ग्रामपंचायत हद्दीतील जिजाबाई तुकाराम पेटकर यांच्या घराचा फेरफार करण्यात आला. ग्रामपंचायतीने केलेला फेरफार अवैध असून तो रद्द करावा, अशी मागणी विठ्ठल विश्वनाथ पेटकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांना निवेदनही सादर केले आहे.
विठ्ठल पेटकर यांची जिजाबाई नात्याने काकू होते. मौजा सालोड वॉर्ड क्रमांक दोन येथे त्यांच्या नावाने घर आहे. घराचे वारसान तुकाराम जगन्नाथ पेटकर यांचा ३१ मार्च १९९३ मध्ये तर जीजाबाईचा १२ सप्टेंबर २०१४ रोजी मृत्यू झाला. त्यांना वारस नाही आणि पालनपोषण विठ्ठल विश्नाथ पेटकर यांनी केल्याने त्यांना घर दिले. शिवाय त्यांना संपूर्ण जबाबदारी दिली आहे. विठ्ठल पेटकर यांनीच जीजाबाई यांच्यावर अंत्यसंस्कार व तेरवीचा कार्यकम केला. त्या घरात विठ्ठल गत ३० वर्षांपासून राहत आहेत. या घराचा सालोड ग्रामपंचायतीने २००१ मध्ये कोणत्याही प्रकारचा जाहीरनामा प्रसिद्ध न करता बेकायदा फेरफार केला. यात शालिक पेटकर यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे. यामुळे शालिक यांना समज द्यावा आणि ग्रा.पं. प्रशासनाने घेतलेला अवैध फेरफार रद्द करावा, अशी माणगी विठ्ठल पेटकर यांनी निवेदनातून केली आहे. सालोड ग्रा.पं. प्रशासनाने १५ दिवसांत योग्य न्याय न दिल्यास आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनातून दिला आहे. निवेदनाच्या प्रती गटविकास अधिकारी आणि सालोड (हिरापूर) ग्रा.पं. सरपंच यांनाही सादर करण्यात आल्या आहेत.(कार्यालय प्रतिनिधी)