शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

गळ्यावर तलवारीचे घाव घालून महिलेची निर्घृण हत्या, वर्ध्यातील घटनेने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 13:10 IST

इतवारा परिसरात पोलिसांचा बंदोबस्त : पुलगावातही दारुविक्रेत्याचा खून

वर्धा : जुन्या वादाच्या कारणातून मद्यधुंद व्यक्तीने वयोवृद्ध महिलेच्या गळ्यावर तलवारीचे तीन ते चार घाव घालून तिला यमसदनी पाठविले. ही घटना वर्ध्यातील इतवारा बाजार परिसरात ६ रोजी रात्री १०.३० ते ११ वाजताच्या सुमारास घडली. तर पुलगाव येथे दारूविक्रीच्या उधारीच्या पैशातून झालेल्या वादात दारूविक्रेत्याची हत्या करून मृतदेह घुईखेड परिसरातील चंद्रभागा नदीपात्रात फेकून दिला. पुलगाव पोलिसांनी हत्या प्रकरणात नऊ आरोपींना अटक केली तर वर्ध्यातील घटनेच्या आरोपीचा शोध घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मरियम शाह (६०) रा. इतवारा बाजार असे मृत महिलेचे नाव आहे. आरोपी सचिन किसन कांबळे हा फरार आहे. तर अकबर अली जब्बार अली (३२) रा. लिंगूफैल पुलगाव असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पुलगाव पोलिसांनी अनिकेत शंकर वाघाडे, पूनम सतीश इरपाचे, आकाश प्रभाकर कोडापे, गौरव दीपक उईके, रूपेश रामेश्वर कावरे, स्वाती रामेश्वर कावरे, अभय देवीदास भागडकर, किसन मोतीराम राऊत, सुदाम सतीश काकडे, सर्व रा. लिंगूफैल यांना अटक केल्याची माहिती दिली. जिल्ह्यात लागोपाठ झालेल्या खुनांच्या घटनांनी जिल्हा रक्ताळला असून पुन्हा एकदा गुन्हेगारी आपले पाय मजबूत करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

‘मरियम’च्या गळ्यावर तलवार फिरविली अन् ती रक्ताच्या थारोळ्यात पडली

वर्ध्यातील इतवारा बाजार परिसरात घडलेल्या घटनेत मृत मरियम ही पतीसह घरी होती. दरम्यान, आरोपी सचिन किसन कांबळे हा मद्यधुंद अवस्थेत घरासमोर आला आणि जोरजोराने शिवीगाळ करू लागला. २२ जुलै रोजी आरोपी सचिनला सूरज गौतम आणि धीरज गौतम यांनी मारहाण केली होती. या प्रकरणात शहर ठाण्यात गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता. याच कारणातून वाद उफाळला आणि आरोपी सचिन याने मृत मरियमच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करून मरियम व तिचा पती मेहबूब यांना तुम्ही धीरज व सूरजला माझ्याविरोधात भडकविले, आज तुमचा गळा चिरतो, असे म्हणत मेहबूबला घरातून खेचून बाहेर आणत मारहाण करून त्याच्या डोक्यावरून तलवार फिरविली.

मेहबूब घाबरून तेथून पळून गेला तेव्हा त्याची पत्नी मृत मरियम ही मध्यस्थीसाठी गेली आणि माझ्या पतीला का मारतो, अशी विचारणा केली असता क्रूरकर्मा सचिनने मरियमच्या डोक्याचे केस ओढून तिला रस्त्यावर खाली पाडून जवळील धारदार तलवारीने मरियमच्या गळ्यावर सपासप तीन ते चार घाव घातले. मरियम रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडली. हे पाहून आरोपी सचिनने तेथून पळ काढला. याबाबतची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. अवघ्या काही मिनिटांतच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड तसेच शहर पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

पोलिस चौकी उघडी असती तर वाचला असता जीव..

इतवारा परिसर हा अतिसंवेदनशील परिसर म्हणून ओळखला जातो. या परिसरात अनेकदा गंभीर घटना घडलेल्या आहेत. मरियमची हत्या ज्या ठिकाणी करण्यात आली त्याच्या अगदी शंभर पावलांवर पोलिस चौकी आहे. पोलिस चौकी जर उघडी असती तर कदाचित मरियमचा जीव वाचला असता, अशी प्रतिक्रिया तेथील नागरिकांनी दिली.

आरोपी ‘सचिन’ गुन्हेगारी प्रवृत्तीचाच

आरोपी सचिन कांबळे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात विविध कलमांन्वये गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. त्यातच मृत मरियमचा पती मेहबूब ऊर्फ पाडप्या हादेखील गुन्हेगारी वृत्तीचा असून गांजा विक्रीच्या गुन्ह्यांची नोंद त्याच्याविरुद्ध असल्याची माहिती आहे.

पोलिसांची पथके आरोपीच्या शोधात

स्थानिक गुन्हे शाखा आणि शहर पोलिसांकडून समांतर तपास केल्या जातो आहे. खुनाची घटना घडताच आरोपीच्या शोधार्थ गुन्हे शाखेची पथके आणि शहर पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी इतवारा परिसर, स्मशानभूमीसह सेवाग्राम रेल्वेस्थानक परिसर मध्यरात्री पिंजून काढल्याची माहिती आहे.

अकबरचा मृतदेह नदीत फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

दारूच्या उधारीतून दारूविक्रेत्या अकबर अली जब्बार अली याची हत्या करून मृतदेह अमरावती जिल्ह्यातील घुईखेड परिसरातील चंद्रभागा नदीपात्रात फेकून देत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी मृताची पत्नी रजिया परवीन अकबर अली हिने पुलगाव पोलिसात तक्रार दिली. मृत अकबर हा पत्नी व तीन मुलांसह निंबूफैल परिसरात राहायचा. मृत दारूविक्रीचा व्यवसाय करायचा. परिसरातील गवारी मोहल्ल्यातील रहिवासी पूनम गवारी, सागर गवारी याच्या घरी अकबरचे येणे-जाणे होते. इतकेच नव्हे तर मृत अकबर आणि पूनमचे अनैतिक संबंध असल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

४ ऑगस्ट रोजी मृत अकबर रात्री ११ वाजता जेवण करून बाहेर गेला. रात्री १२ वाजताच्या सुमारास मृत अकबर आणि पूनम हे दोघही रेल्वे रुळालगत दिसून आले होते मात्र सकाळपर्यंत अकबर घरी न पोहचल्याने अकबरचा सर्वत्र शोध घेण्यात आला. ५ ऑगस्ट रोजी अकबरच्या मित्राला पुलगाव पोलिसांनी ठाण्यात बोलावून तळेगाव दशासर हद्दीत सापडलेल्या मृतदेहाचा फोटो दाखविला असता तो मृतदेह अकबर अलीचा असल्याचे समजले. दारूविक्रीच्या उधारीच्या पैशातून अकबर अलीची हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली असून याप्रकरणी नऊ आरोपींना पुलगाव पोलिसांनी अटक केल्याची माहिती दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwardha-acवर्धा