शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

पूल खचला, दोन गावांचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 10:31 PM

तालुक्यातील सुकळी-दौलतपूर गावाला जोडणाऱ्या रस्त्यावरील पुलाचा काही भाग खचल्याने दोन गावांचा संपर्क तुटला आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींना दुरुस्तीसाठी पाठपुरावा करण्याबाबत मागणी केली. मात्र, कायम दुर्लक्ष केले जात आहे.

ठळक मुद्देवहिवाटीचा प्रश्न बिकट : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अधांतरी

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : तालुक्यातील सुकळी-दौलतपूर गावाला जोडणाऱ्या रस्त्यावरील पुलाचा काही भाग खचल्याने दोन गावांचा संपर्क तुटला आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींना दुरुस्तीसाठी पाठपुरावा करण्याबाबत मागणी केली. मात्र, कायम दुर्लक्ष केले जात आहे. पुलाची तातडीने दुरुस्ती न झाल्यास मोठी हानी होण्याची शक्यता ग्रामस्थांनी वर्तविली आहे.यावर्षीच्या जोरदार पावसामुळे पुलाचा भाग खचल्याने सुकळी -दौलतपूर या दोन गावांतील वहिवाट पूर्णत: ठप्प झाली आहे. यात शेतकऱ्यांसह विद्यार्थी, वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.मागीलवर्षी जुलै महिन्यात पावसामुळे याच पुलाचा काही भाग खचला होता. मात्र, या पुलाची डागडुजी करण्याकडे प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केले. परिणामी, मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नाल्याला पूर आला आणि पुलाजवळील रस्त्याचा काही भाग पुन्हा जास्त खचत वाहून गेला. त्यामुळे शेतकºयांसह वाहनधारकांना वहिवाट कशी करावी, असा प्रश्न पडला आहे.सुकळी गावाजवळून जाणाºया या नाल्याला पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावरून पाणी येत असल्याने थोडा जरी पाऊस आला तरी या नाल्याचे पाणी रस्त्याच्या दुतर्फा वरून वाहते. या नाल्यावर सिमेंटच्या पायल्या टाकून थातूरमातूर पुलाचे बांधकाम करण्यात आले; पण त्याचे प्राकलन अद्यापही तयार करण्यात आले नाही. नाल्यावर पलिाचे बांधकाम झाल्यानंतर मागील वर्षीच्या जुलै महिन्यातील पावसाने पुलाचा काही भाग व पुलाच्या जवळील रस्त्याचा काही भाग पावसाच्या पाण्याने वाहून गेला. त्यामुळे भर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले. दरम्यानच्या काळात अनेक लहाने-मोठे अपघातसुद्धा झाले. या वर्षी आलेल्या मुसळधार पावसामुळे या रस्त्यावरील पुलाची दुरवस्था झाली असून वाहन काढणे कठीण झाले आहे. तसेच चारचाकी वाहन जात नसल्यामुळे या गावातील विद्यार्थ्यांचा तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी ये-जा करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुलाची तत्काळ पक्की डागडुजी करून मार्ग पूर्ववत करावा व पावसाळा संपताच पुलाचे नवीन बांधकाम करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.लोकप्रतिनिधींची उदासीन भूमिकापुराच्या पाण्यामुळे पुलासह रस्त्याचा काही भाग वाहून गेला. यामुळे वहिवाट बिकट झाली आहे. सध्या शेतीचा हंगाम आहे. यातच ही समस्या निर्माण झाल्याने शेतकºयांना त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींकडे व्यथा मांडली. मात्र, काहीही हालचाली होताना दिसून येत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

टॅग्स :Rainपाऊसroad transportरस्ते वाहतूक