स्तनपान हे जीवनदायी वरदान
By Admin | Updated: August 12, 2014 00:05 IST2014-08-12T00:05:56+5:302014-08-12T00:05:56+5:30
जन्मापासून आईचे दुध पिणारे बाळ रोगप्रतिकारक शक्ती वाढल्यामुळे पुढील आयुष्य सुदृढपणे जगत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे स्तनपानास जन्मत:च प्रत्येक बाळाला मिळालेले जीवनदायी वरदानच म्हणावे लागेल,

स्तनपान हे जीवनदायी वरदान
सुरेखा तायडे : प्रियदर्शिनी महिला महाविद्यालयातील कार्यक्रमात जागृती
वर्धा : जन्मापासून आईचे दुध पिणारे बाळ रोगप्रतिकारक शक्ती वाढल्यामुळे पुढील आयुष्य सुदृढपणे जगत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे स्तनपानास जन्मत:च प्रत्येक बाळाला मिळालेले जीवनदायी वरदानच म्हणावे लागेल, असे मत महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था, सेवाग्राम येथील प्रसुतीरोग तज्ज्ञ डॉ. सुरेखा तायडे यांनी व्यक्त केले.
येथील प्रियदर्शिनी महिला महाविद्यालयात गृहअर्थशास्त्र विभागाच्यावतीने स्तनपानाचे महत्त्व कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी त्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. रंभा सोनाये होत्या.
स्तनपान पंधरवड्यानिमित्त येथील विद्यार्थिनींना तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. सावंगी आरोग्य विद्यापीठातील डॉ. दिप्ती श्रीवास्तव यांचे स्तनपानाविषयक वैद्यकीय माहिती देणारे सादरीकरण घेण्यात आले. महिलांमधील स्तनपानविषयक जागृती तपासण्याकरिता आलोडी व नालवाडी गावांमध्ये विद्यार्थिनीच्या मदतीने नमूना सर्वेक्षण घेण्यात आले. तसेच जनजागृती करून महत्त्व विशद केले. या उपक्रमात जनजागृतीकरिता सेवाग्राम मेडिकल कॉलेज येथील विद्यार्थिनींनी स्तनपानाच्या महत्त्वावर पथनाट्य सादर केले. मनोरंजक पद्धतीने सादर केलेल्या या नाट्यातून महिला आणि विद्यार्थिनींपर्यंत विषयातील प्रमुख माहिती देण्यात आली. या उपक्रमाच्या आयोजनात प्रा. वैशाली मेघळ, प्रा. अंशुजा भोयर, डॉ. प्रियराज महेशकर, प्रा. दीपक महाजन, विनोद बावणे, राजू मुंजेवार, नरेश आगलावे व गृहअर्थशास्त्र अभ्यास मंडळाच्या विद्यार्थिंनींनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)