प्राणघातक हल्ला प्रकरणातील दोघांना अटक

By Admin | Updated: June 19, 2017 01:06 IST2017-06-19T01:06:51+5:302017-06-19T01:06:51+5:30

स्थानिक तुकाराम वॉर्ड येथील अमीत कुमरे याच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे.

Both of them were arrested in the assault case | प्राणघातक हल्ला प्रकरणातील दोघांना अटक

प्राणघातक हल्ला प्रकरणातील दोघांना अटक

बोरगाव (मेघे) येथून घेतले ताब्यात : मित्राच्या घरी होते लपून
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : स्थानिक तुकाराम वॉर्ड येथील अमीत कुमरे याच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. या दोघांनाही शहर पोलिसांनी बोरगाव (मेघे) भागातील गणेश नगरातून रविवारी पहाटे ताब्यात घेतले. रवी जुमडे रा. आदिवासी कॉलनी व राहूल कासोर रा. पोद्दार बगीचा अशी आरोपींची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. हे दोघेही मित्राच्या घरी दडून बसले होते.
अमीत कुमरे याच्यावर प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी शहर पोलिसात यशू कृपलानी, रवी जुमडे, राहूल कासोर, उमेश ठाकरे याच्यासह आणखी दोन जणांविरुद्ध भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल आहे. घटनेच्या दिवशीपासून या प्रकरणातील सर्व आरोपींना जेरबंद करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू होते. आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांच्या तीन चमुही रवाना झाल्या आहेत.

कुठल्याही परिस्थितीत आरोपी आणा; एसपींकडून कानउघाडणी
या प्रकरणात असलेले आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याने त्यांना अटक करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिल्याची माहिती आहे. या प्रकरणी त्यांनी शहर पोलिसांना चांगलेच खडसावल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.

Web Title: Both of them were arrested in the assault case