लूट सुरूच, तरीही तुर हमी केंद्रांवर प्रश्नचिन्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 06:00 IST2020-02-05T06:00:00+5:302020-02-05T06:00:15+5:30
जिल्ह्यातील १६ तालुक्यात तूर खरेदीचे केंद्र उघडणार आहेत. विदर्भ को-ऑपरेटिव मार्केटिंग फेडरेशन आणि खरेदी विक्री संघाच्या नेतृत्वात ही खरेदी केली जाणार आहे. त्या अनुषंगाने नाफेडने पूर्वकल्पना म्हणून ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया हाती घेतली आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांची संख्या ७ हजारांच्या घरात पोहचली आहे.

लूट सुरूच, तरीही तुर हमी केंद्रांवर प्रश्नचिन्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : खुल्या बाजारात कापसाचे दर घसरले आहेत. हे दर हमीदराच्या खाली आले आहेत. यातून शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू झाली आहे. शेतकऱ्यांच्या असहाय्यतेचा फायदा घेत व्यापारी शेतकºयांची आर्थिक लूट करीत आहेत. यानंतरही तूर खरेदीचे हमी केंद्र कधी उघडतील, याची शाश्वती नाही. यामुळे शेतकºयांच्या अडचणी आणखीच वाढल्या आहेत.
जिल्ह्यातील १६ तालुक्यात तूर खरेदीचे केंद्र उघडणार आहेत. विदर्भ को-ऑपरेटिव मार्केटिंग फेडरेशन आणि खरेदी विक्री संघाच्या नेतृत्वात ही खरेदी केली जाणार आहे. त्या अनुषंगाने नाफेडने पूर्वकल्पना म्हणून ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया हाती घेतली आहे.
या ठिकाणी शेतकऱ्यांची संख्या ७ हजारांच्या घरात पोहचली आहे. १५ नंतर अशा शेतकºयांची तूर खरेदी केली जाण्याची शक्यता आहे. मात्र त्या दृष्टीने लागणाºया उपाययोजना या केंद्रावर अद्याप झाल्या नाही. खरेदी झालेली तूर ठेवायची कुठे हा गंभीर प्रश्न शासकीय यंत्रणेपुढे निर्माण झाला आहे. पोते आणि जागेची कमतरता हा मुख्य प्रश्न तूर खरेदी करताना उभा राहणार आहे. या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी उपाययोजना झाल्या नाहीत.
पणन महासंघाने खरेदी केलेल्या कापसाच्या गाठी शासकीय गोदामात ठेवण्यात आल्या आहेत. त्यासोबत जुनी तूरही या गोदामात आहे. यामुळे नवीन तूर ठेवण्यापूर्वीच जागेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यातून मार्ग न काढल्यास शेतकºयांना हमीकेंद्रासारख्या मुख्य उपाययोजनांना मुकावे लागण्याचा धोका आहे.
अशा स्थितीत शेतकºयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारी यंत्रणाच बाजारात नसेल तर शेतकºयांची अक्षरश: लूट होण्याचा धोका आहे. बाजारात तूर येण्यापूर्वी पर्यायी उपाययोजना उभी करण्यात यावी. त्यावर ठोस तोडगा काढावा, अशी मागणी तूर उत्पादक शेतकरी करीत आहेत.