कालव्यात तरुणाचा मृतदेह आढळला
By Admin | Updated: July 20, 2015 02:08 IST2015-07-20T02:08:04+5:302015-07-20T02:08:04+5:30
नजीकच्या खातखेडा शिवारातील निम्न वर्धा प्रकल्पाच्या मुख्य कालव्यात एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला. ही घटना रविवारी सकाळी उघड झाली.

कालव्यात तरुणाचा मृतदेह आढळला
खातखेडा येथील निम्न वर्धा प्रकल्पाच्या कालव्यातील प्रकार
पुलगाव : नजीकच्या खातखेडा शिवारातील निम्न वर्धा प्रकल्पाच्या मुख्य कालव्यात एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला. ही घटना रविवारी सकाळी उघड झाली.
निम्न वर्धा प्रकल्पाच्या मुख्य कालव्यातून एका तरुणाचा मृतदेह वाहून जात असल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले. सदर घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. दरम्यान पोलीस पाटील रूपराव रामभाऊ राऊत यांनी पुलगाव पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. परिसरातील नागरिकांच्या मदतीने पाण्यात वाहत असलेल्या युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्याचे वय ४० ते ४५ वर्षे असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता रुग्णालयात पाठविला. सदर घटनेची रूपराव राऊत यांनी पुलगाव पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृतकाची ओळख पटविणे सुरू होते. वृत्त लिहिस्तोवर या प्रकरणातील आरोपीची ओळख पटू शकली नसून पोलीस प्रयत्नात आहेत. (शहर प्रतिनिधी)
इसमाचा मृत्यू
वर्धा- येथील सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केलेल्या रमेश राममूर्ती वैद्य (६०) यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्यांना तपासणीअंती मृत घोषित केले. ही घटना रविवारी सकाळी घडली. घटनेची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली. रमेश यांच्या मृत्यूचे कारण अद्याप कळू शकले नाही. पोलिसांनी माहिती मिळताच आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू आहे.