संशयास्पद स्थितीत महिलेचा मृतदेह आढळला
By Admin | Updated: July 2, 2015 02:24 IST2015-07-02T02:24:17+5:302015-07-02T02:24:17+5:30
येथील रेल्वे स्टेशन मागील इंदिरा गांधी वॉर्डातील दर्गाहजवळ असलेल्या मैदानात स्मिता गजानन वैद्य (३५) या महिलेचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला.

संशयास्पद स्थितीत महिलेचा मृतदेह आढळला
विविध घटनांत चार आत्महत्या : पोलीस तपास सुरू
हिंगणघाट : येथील रेल्वे स्टेशन मागील इंदिरा गांधी वॉर्डातील दर्गाहजवळ असलेल्या मैदानात स्मिता गजानन वैद्य (३५) या महिलेचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला.
पोलीस सूत्रानुसार, सदर महिलेचा पती हिंगणघाट येथील दाल मिलमध्ये कामाला आहे. हे दोघेही संत कबीर वॉर्डात भाड्याने राहात होते. स्मिता ही गत पंधरा दिवसापासून चिचमंडळ ता. राळेगाव येथे आई, वडिलांजवळ राहत होती. बुधवारी १ जुलै रोजी सकाळी तिचा मृतदेहच दर्गाहजवळील मैदानात आढळून आला. स्मिताच्या मृतदेहाच्या शेजारी विषारी औषधाचा डबा आणि ३० जूनच्या तारखेचे बसचे टिकीट आढळून आले. याप्रकरणाचा तपास ए. एस. आय. नळे करीत असून पोलिसांनी प्रथमदर्शी आत्महत्येचा संशय व्यक्त केला.(तालुका प्रतिनिधी)