नदीपात्रात आढळला इसमाचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 22:24 IST2018-08-02T22:24:10+5:302018-08-02T22:24:58+5:30
तालुक्यातील मांडगाव येथील रहिवासी असलेल्या राजू पत्रुजी गोलाईत (४०) याचा मृतदेह तांबोळी यांच्या शेताजवळील नदीपात्रत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. राजू हा गत २० दिवसांपासून घरून बेपत्ता होता. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसात त्याच्या कुटुंबियांनी तक्रार सादर केली होती.

नदीपात्रात आढळला इसमाचा मृतदेह
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : तालुक्यातील मांडगाव येथील रहिवासी असलेल्या राजू पत्रुजी गोलाईत (४०) याचा मृतदेह तांबोळी यांच्या शेताजवळील नदीपात्रत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. राजू हा गत २० दिवसांपासून घरून बेपत्ता होता. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसात त्याच्या कुटुंबियांनी तक्रार सादर केली होती. दरम्यान त्याचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात उलट-सुटल चर्चेला उधाण आले आहे.
नदीपात्रात मृतदेह तरंगत असल्याचे गुरूवारी सकाळी गुराख्याच्या निदर्शनास आले. त्याने घटनेची माहिती गावातील नागरिकांना दिली. दरम्यान पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह नदीपात्राबाहेर काढला. त्यानंतर मृतकाची ओळख पटली. राजू हा १३ जुलैला रात्री कुटुंबियांना कुठलीही माहिती न देता घरा पडला होता. त्यानंतर तो घरी परत न आल्याने शोधाशोध करण्यात आली. परंतु, तो कुठेही न आढळून आल्याने अखेर त्याच्या कुटुंबियांनी हिंगणघाट पोलीस स्टेशन गाठून राजू हा हरविला असल्याची तक्रार नोंदविली. त्यानंतर राजूचा मृतदेह आढळून आला. या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली आहे.
बुडीत निघालेल्या चिटफंड कंपनीचा गुंतवणूकदार
राजु हा बुडीत निघालेल्या चिटफंड कंपनीचा एजेंट व गुंतवणुतकदार होता. त्यांने कित्यक लोकांच्या पैशाची या कंपनीत गुंतवणूक केली होती. घटनेची माहिती मिळताच समुद्रपूर पोलिसांना मिळताच सुभाष आदे, चांगदेव भुरंगे, वीरेंद्र काबंळे, राहुल पुरी यांनी घटनास्थ गाठुन मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरिय तपासणीकरिता रुग्णालयात पाठविला.