शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

महिला, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी भाजप देणार धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 06:00 IST

जनादेशाचा अपमान करून महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली. नव्या सरकारच्या बेफिकिरीमुळे राज्यात महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. शिवाय हिंगणघाट जळीत प्रकरणात अद्याप अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र सरकारने पोलिसांना पाठविलेले नाही. याकडे या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्यात येणार आहे.

ठळक मुद्देशिरीष गोडे। २५ फेब्रुवारीला तहसीलसमोर देणार धरणे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांची फसवणूक आणि महिलांवरील वाढता अत्याचाराच्या निषेध नोंदविण्यासाठी तसेच समाजातील याच घटकांच्या विविध समस्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्यावतीने २५ फेबु्रवारीला वर्धा जिल्ह्यातील आठही तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे यांनी पत्रपरिषदेत दिली.जनादेशाचा अपमान करून महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली. नव्या सरकारच्या बेफिकिरीमुळे राज्यात महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. शिवाय हिंगणघाट जळीत प्रकरणात अद्याप अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र सरकारने पोलिसांना पाठविलेले नाही. याकडे या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्यात येणार आहे. भाजपचा विश्वासघात करणारी शिवसेना कर्जमाफीच्या नावाखाली राज्यातील शेतकऱ्यांचीही फसवणूकच करू पाहत आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरीव शासकीय मदतीचे आश्वासन सध्या आश्वासनच ठरत आहे. फडणवीस सरकारच्या काळातील विकासकामांना या महाविकास आघाडीच्या सरकारने स्थगिती देऊन नागरिकांच्या अडचणीत भर टाकली.एकूणच राज्यातील हे सरकार फसवणुकीचे धोरण अवलंबत असल्याचे डॉ. गोडे यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी खा. रामदास तडस, नितीन मडावी, अतुल तराळे, किशोर दिघे, मिलिंद भेंडे, विलास कांबळे, अविनाश देव, पवन परियाल उपस्थित होते.जळीत प्रकरणाकडे लक्ष वेधणार- तडसहिंगणघाट येथील जळीत प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्याचे तसेच विशेष शासकीय अभियोक्ता म्हणून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचे आश्वासन महाविकास आघाडीतील मंत्र्यांनी दिले होते. परंतु, अद्याप अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केल्याबाबतचे पत्र पोलीस प्रशासनाला प्राप्त झालेले नाही. शिवाय पीडितेच्या कुटुंबीयांना शासकीय मदत मिळालेली नाही. या आंदोलनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा हिंगणघाट जळीत प्रकरणासह महिलांवरील वाढण्यात अत्याचाराच्या विषयाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यात येणार आहे असे खा. रामदास तडस यांनी सांगितले.भाजप आमदार देणार विधानभवनात ठिय्या२५ फेब्रुवारीचे हे आंदोलन राज्यव्यापी आहे. तर २४ फेबु्रवारीला मुंबई येथे बैठक असल्याने जिल्ह्यातील भाजपचे तिन्ही आमदार मुंबई येथे राहतील. असे असले तरी हे तिन्ही आमदार मुुंबईतील विधानभवनासमोर धरणे देऊन राज्य सरकारच्या दुर्लक्षित धोरणांचा निषेध नोंदविणार असल्याचेही यावेळी डॉ. गोडे यांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीRamdas Tadasरामदास तडस