वर्धा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा
By Admin | Updated: March 21, 2017 16:44 IST2017-03-21T16:44:53+5:302017-03-21T16:44:53+5:30
वर्धा जिल्हा परिषदेवर बहुमतात भाजपने झेंडा फडकविला

वर्धा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा
ऑनलाइन लोकमत
वर्धा, दि. 21 - वर्धा जिल्हा परिषदेवर बहुमतात भाजपने झेंडा फडकविला. मागील अडीच वर्षे सोडता जिल्हा परिषद काँग्रेसचा गड होता.
अध्यक्षपदी भाजपचे नितीन मडावी 34 मते घेत विजयी झाले, तर उपाध्यक्षपदी भाजपच्या कांचन नांदुरकर 34 मते घेत विजयी झाल्या. काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार सुमित्रा मलगाम व उपाध्यक्षपदाचे उमेदवार त्रिलोकचंद कोहळे यांना प्रत्येकी 14 मते मिळाली. एका अपक्ष उमेदवाराने काँग्रेसला मतदान केले. शिवसेनेचे 2 सदस्य गैरहजर तर आणि बसपाचे 2 सदस्य तटस्थ होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही सदस्यांनी भाजपला समर्थन दिले. जिल्हा परिषदेत भाजप 31, काँग्रेस 13, राकाँ, सेना, बसपा प्रत्येकी 2, आरपीई 1 व अपक्ष 1 असे पक्षीय बलाबल आहे.