शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी खासदारांचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा, पोलिसांनी अनेकांना घेतले ताब्यात...
2
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
3
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
4
भारताला 'डेड इकॉनॉमी' म्हणणाऱ्या ट्रम्प यांचा 'डॉलर'च धोक्यात; एक्सपर्टनं दिला मोठा इशारा
5
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
6
पुन्हा जिवंत करण्यासाठी तरुणाचा मृतदेह ५ दिवस पाण्यात ठेवला अन् बाजूला बँड वाजवत बसले! कुठे घडला 'हा' प्रकार?
7
१५ महिन्यांच्या चिमुकल्याला ढकलले, मारले आणि मग..., डे-केअर सेंटरमधील धक्कादायक प्रकार
8
"भारत चकचकित मर्सिडीज, पाकिस्तान कचऱ्यानं भरलेला ट्रक", फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी PAK ची अब्रू वेशीवर टांगली!
9
कोण म्हणतोय प्रेमात धोका... भारतीय सुधारले; २ वर्षांत १६% कमी झाले, नात्यात हे निवडू लागले...
10
Shravan Somvar 2025: शिवलिंगावर अभिषेक करताना तुम्हीसुद्धा 'ही' चूक करताय का? पूजा राहील अपूर्ण!
11
सरकार बँक ऑफ महाराष्ट्र-LIC सह 'या' ५ बँकांमधील हिस्सा विकणार, गुंतवणूकदारांना काय फायदा?
12
दिलदार! भीक मागून १.८३ लाख जमवले, मंदिरासाठी दान केले; रंगम्माच्या मनाचा मोठेपणा
13
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
14
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय कधी आहे? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, मान्यता
15
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
16
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
17
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
18
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?
19
फक्त १०,००० रुपये गुंतवून जमा होईल ३ कोटी रुपयांचा फंड! १०:१२:३० चा फॉर्म्युला असा करतो काम
20
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...

सातच महाविद्यालयात बायोमेट्रिक मशीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 23:45 IST

कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घेण्याचा आदेश शासनाकडून देण्यात आला. आता या आदेशाला दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी जिल्ह्यातील ६२ कनिष्ठ महाविद्यालयांपैकी केवळ सातच महाविद्यालयाने बायोमेट्रिक

ठळक मुद्देजिल्ह्यातील ५५ महाविद्यालयांकडून कानाडोळा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घेण्याचा आदेश शासनाकडून देण्यात आला. आता या आदेशाला दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी जिल्ह्यातील ६२ कनिष्ठ महाविद्यालयांपैकी केवळ सातच महाविद्यालयाने बायोमेट्रिक लावल्याचा अहवाल शिक्षण विभागाला सादर केला आहे. मात्र, येथे बायोमेट्रीक पद्धतीने हजेरी घेतली जातात का? हा सशोधनाचा विषय ठरत आहे.कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेत नाममात्र प्रवेश घेऊन कोचिंग क्लासेमणध्ये गर्दी करणाऱ्या दांडीबहाद्दर विद्यार्थ्यांना आळा घालण्यासाठी शासनाने कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची बायोमेट्रीक पद्धतीने हजेरी घेण्याचा निर्णय घेतला. १५ जून २०१८ रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्यावतीने घेतलेल्या या निर्णयानुसार राज्यातील सर्व खाजगी अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसाहाय्यित कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांची हजेरी बायोमेट्रीक पद्धतीने सुरु करण्याचे निर्देश शिक्षण विभागाला देण्यात आले. शिक्षण विभागाने महाविद्यालयांना पत्र पाठवून बायोमेट्रिक लावण्याबाबतचा अहवाल मागविला. परंतु, दोन महिन्याचा कालावधी लोटला तरी महाविद्यालयाने अहवाल सादर केला नाही. केवळ सातच महाविद्यालयाने अहवाल पाठवून बायोमेट्रीक लावल्याचे शिक्षण विभागाला कळविले. अजुनही जिल्ह्यातील जवळपास ५५ महाविद्यालयाने कोणतीही कार्यवाही केली नसल्याने शिक्षण विभाग काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.लोकमतच्या वृत्तानंतर शिक्षण विभाग लागला कामालाबायोमेट्रिक हजेरी योजना टप्प्या-टप्प्याने कार्यन्वित करण्याचा निर्णय घेत २०१८-१९ या शैक्षणिक वर्षाकरिता मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक व औरंगाबाद या पाच विभागातील सर्व विज्ञान शाखेच्या कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची उपस्थिती बायोमेट्रिक पद्धतीने घ्यायचे निर्देश दिले होते. परंतु, या पहिल्या टप्प्यातच या योजनेचा बोजवारा उडाल्याचे वृत्त लोकमत प्रकाशित करुन जिल्ह्यातील वास्तविकता मांडताच माध्यमिक शिक्षण विभाग कामाला लागला. शिक्षण विभागाकडून महाविद्यालयाना २४ व २९ आॅगस्ट रोजी पत्र पाठवून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. असे असले तरी या पत्रालाच अनेकजण फाटा देत आहेत.जिल्हा परिषद सदस्यांनी घेतली दखलजिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयात बायोमेट्रिक हजेरीला ठेंगा दाखविला जात असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच जिल्हा परिषद सदस्य धनराज तेलंग यांनी दखल घेत यासंदर्भात जिल्हा परिषद अध्यक्षांंना पत्र दिले. येणाऱ्या सर्वसाधारण सभेत जिल्ह्यात विज्ञान महाविद्यालयांची संंख्या किती. किती महाविद्यालयाने बायोमेट्रिक प्रणाली लावली आणि किती महाविद्यालयाने लावली नाही, अशा सर्व महाविद्यालयांची नावे सांगावी. तसेच न लावणाºया महाविद्यालयांवर शिक्षण विभागाकडून कोणती कार्यवाही करण्यात आली. याची सविस्तर माहिती सादर करण्याची मागणी पत्रातून केली आहे. त्यामुळे आता शिक्षण विभागासह महाविद्यालयांचेही धाबे दणाणले आहे.महाविद्यालयांना पत्र देऊन अवगत करण्यात आले आहे. सात महाविद्यालयांनी मशीन लावल्याबाबत अहवाल सादर केला. उर्वरीत महाविद्यालयांना ३० आॅगस्टपर्यंत कालावधी देण्यात आला होता. आता ज्यांंनी मशीन लावली नाही त्यांची संचमान्यता रोखणे तसेच मान्यताही काढण्याबाबत कारवाई केली जाईल. तसेच जेथे बायोमेट्रीक लावल्या तेथील तपासणी केली जाईल.- रवींद्र टेंभरे, सहा.शिक्षण उपनिरिक्षक, जि.प. वर्धा.

टॅग्स :Studentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय