लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : मद्यधुंद अवस्थेत चारचाकी वाहन चालविणाऱ्याने रस्त्याच्याकडेला असलेल्या दोघांना धडक दिली. आरोपी वाहनचालक इतक्यावरच थांबला नाही तर त्याने आपल्या ताब्यातील वाहन थेट दिशादर्शक फलकावर नेत विद्युत खांबावर चढविले. या विचित्र अपघातात एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना नजीकच्या रेहकी येथे बस स्थानकासमोर बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. हरिशचंद्र उर्फ होमदेव चंफत ठाकरे (४६) रा. रेहकी असे मृतकाचे तर मारोती श्यामराव टुले े(६२) असे गंभीर जखमीचे नाव आहे.वर्धा येथील न्यू आर्टस् कॉलेजच्या मागील भागात राहणारा अभय श्यामराव सोमनकर (४२) हा त्याचे कुटुंबिय सेलू येथील लग्न समारंभासाठी आले होते. सदर लग्नसोहळा आटोपल्यानंतर ते एम.एच. ३४ ए.एम. ७५०० क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने येळाकेळी येथे नातलगांकडे जात होते. वाहनातील पुरुष मंडळी व वाहनचालक अभय हा मद्यधुंद अवस्थेत होते. भरधाव वाहन रेहकी येथे आले असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. दरम्यान वाहनाने रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या होमदेव व मारोती यांना धडक देत वाहन दिशादर्शक फलक व विद्युत खांबावर चढली. यात होमदेव व मारोती हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; पण वाटेतच होमदेव ठाकरे याचा मृत्यू झाला. मारोती टुले यांच्यावर सुरूवातीला सेलू येथील रुग्णालयात उपचार करूनत्यांना पुढील उपचारासाठी सेवाग्राम येथील रुग्णालयात हलविले आहे.संतप्त जमावाकडून वाहनचालकाला चोपअपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. दरम्यान चारचाकी वाहनातील पुरुष मंडळींसह चालकही मद्यधुंद अवस्थेत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर बघ्यांच्या गर्दीतील सुजान नागरिकांचा पारा चढला. संतप्त नागरिकांनी यावेळी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चारचाकी वाहनाच्या चालकाला चांगलाच चोप दिला. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. या अपघाताची नोंद सेलू पोलिसांनी घेतली आहे.
भरधाव कारने सायकलस्वारास चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 23:50 IST
मद्यधुंद अवस्थेत चारचाकी वाहन चालविणाऱ्याने रस्त्याच्याकडेला असलेल्या दोघांना धडक दिली. आरोपी वाहनचालक इतक्यावरच थांबला नाही तर त्याने आपल्या ताब्यातील वाहन थेट दिशादर्शक फलकावर नेत विद्युत खांबावर चढविले. या विचित्र अपघातात एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
भरधाव कारने सायकलस्वारास चिरडले
ठळक मुद्देएक गंभीर : मद्यधुंद वाहनचालकास पोलिसांनी ठोकल्या बेड्या