शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
4
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
5
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
6
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
7
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
8
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
9
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
10
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
11
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
12
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
13
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
14
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
15
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
16
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
17
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
18
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
19
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
20
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
Daily Top 2Weekly Top 5

भोसा अत्याचार प्रकरण जलदगती न्यायालयात चालवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 06:00 IST

भोसा ग्रामस्थांसह सिंदी शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी संयुक्त रित्या सदर घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी शहरातील बाजार चौकातून मोर्चा काढला. मोर्चा बस स्थानक चौकात येताच विक्रृत मानसिकतेच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. त्यानंतर मोर्चा पोलीस ठाण्याच्या दिशेने मार्गक्रमण झाला.

ठळक मुद्देमागणी : सिंदी (रेल्वे)त निघाला निषेध मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदी (रेल्वे) : नजीकच्या भोसा येथील जि.प. शाळेतील मुख्याध्यापकाने शाळेतीलच दोन चिमुकल्यांवर लैगिंक अत्याचार केला. या प्रकरणातील आरोपीला सिंदी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. असे असले तरी हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी आज सिंदी शहरात मोर्चा काढण्यात आला. मोर्चा पोलीस स्टेशन येथे धडकल्यावर विविध मागण्यांचे निवेदन समुद्रपूरचे नायब तहसीलदार के. डी. किरसार, पोलीस निरीक्षक प्रशांत काळे, सेलूचे ठाणेदार सुनील गाढे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वंदना सोनुने यांना सादर करण्यात आले.भोसा ग्रामस्थांसह सिंदी शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी संयुक्त रित्या सदर घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी शहरातील बाजार चौकातून मोर्चा काढला. मोर्चा बस स्थानक चौकात येताच विक्रृत मानसिकतेच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. त्यानंतर मोर्चा पोलीस ठाण्याच्या दिशेने मार्गक्रमण झाला. मोर्चा पोलीस ठाण्याच्या परिसरात येताच आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने नायब तहसीलदार के. डी. किरसार, पोलीस निरीक्षक प्रशांत काळे, सेलूचे ठाणेदार सुनील गाढे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वंदना सोनुने यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. नराधम मुख्याध्यापक सतीश बजाईत याला कठोर शिक्षा देण्यात यावी. या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा. पीडितांची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी ख्यातनाम वकिल उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी. दोन्ही पीडित मुलींना शासकीय योजनेतून शासकीय मदत देण्यात यावी आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. मोर्चात माजी आमदार राजू तिमांडे, काँग्रेसचे आशिष देवतळे, प्रहारचे जयंत तिजारे, आधार संघटनेचे विक्रम खडसे, भोसा येथील सरपंच पिंकी अंड्रस्कार, उपसरपंच नमिता महंतारे, नगरसेविका वनिता मदनकर, अजया साखळे, बबनराव हिंगणेकर, सुधाकर खेडकर, भाजपचे प्रविण सिर्शिकार, राकाँचे वसंता सिरसे, शेतकरी संघटनेचे प्रमोद शिद, सुधाकर घवघवे, तुषार हिंगणेकर, बाबाराव सोनटक्के, अशोक चि. कलोडे, गजानन खंडाळे, शिरीष डकरे, प्रभाकर कलोडे, अफझल बेरा, ओमप्रकाश राठी, रामेश्वर घंगारे, गुल्लू भंसाळी, शुभम झाडे, प्रविण अंड्रस्कार, शुभम महंतारे, प्रविण भारसाखरे, ज्ञानेश्वर चौधरी, मंगेश मिस्किन, सुरज आस्थानकार यांच्यासह विविध संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.