भरधाव कारचा टायर फुटल्याने ट्रेलरवर आदळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:00 IST2020-12-05T05:00:00+5:302020-12-05T05:00:39+5:30

नागपूर येथून अमरावतीकडे जाणाºया एम.एच.३० ए. झेड. २६९२ क्रमांकाच्या भरधाव कारचा तळेगाव नजीकच्या सत्याग्रही घाटात अचानक समोरील टायर फुटला. त्यामुळे कार नियंत्रित होऊन विरुद्ध दिशेने येणाºया सी.जी. ०४ जे. बी. ३१२२ क्रमांकाच्या टेलरला धडकली. या अपघातात कार रस्त्याच्या खाली फेकल्या गेल्याने कारचा चुराडा झाला. या कारमधून बाप-लेक प्रवास करीत होते. कारची अवस्था पाहून कुणीही वाचले नसेल असा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला.

Bhardhaw's car's tire ruptured and hit the trailer | भरधाव कारचा टायर फुटल्याने ट्रेलरवर आदळली

भरधाव कारचा टायर फुटल्याने ट्रेलरवर आदळली

ठळक मुद्देदैव बलवत्तर म्हणून बाप-लेक बचावले

    लाेकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव (श्या.पंत.) : भरधाव कारचा समोरील टायर फुटल्याने अनियंत्रित होऊन विरुद्ध दिशेने येणाºया ट्रेलरवर धडकली. यात कारचा चुराडा झाला असून दैव बलवत्तर असल्याने कारमधील बाप-लेक सुखरुप बचावले. हा अपघात नागपूर-अमरावती महामार्गावरील सत्याग्रही घाटात शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडला. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. 
नागपूर येथून अमरावतीकडे जाणाºया एम.एच.३० ए. झेड. २६९२ क्रमांकाच्या भरधाव कारचा तळेगाव नजीकच्या सत्याग्रही घाटात अचानक समोरील टायर फुटला. त्यामुळे कार नियंत्रित होऊन विरुद्ध दिशेने येणाºया सी.जी. ०४ जे. बी. ३१२२ क्रमांकाच्या टेलरला धडकली. या अपघातात कार रस्त्याच्या खाली फेकल्या गेल्याने कारचा चुराडा झाला. या कारमधून बाप-लेक प्रवास करीत होते. कारची अवस्था पाहून कुणीही वाचले नसेल असा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला. पण, दोघांनाही जखमी अवस्थेत कारमधून बाहेर काढून उपचाराकरिता दुसºया वाहनाने नागपूरला हलविले. त्यामुळे जखमींचे नावे कळू शकली नाही. अपघाताची माहिती मिळताच तळेगांव पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

 

Web Title: Bhardhaw's car's tire ruptured and hit the trailer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात