भरधाव कारचे टायर फुटले; सुदैवाने वाचला वडील व मुलाचा जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 16:14 IST2020-12-04T16:13:55+5:302020-12-04T16:14:37+5:30
Wardha News Accident नागपूरकडून अमरावतीला जात असलेल्या कारचा समोरचा टायर अचानक फुटून झालेल्या अपघातात वडील व मुलगा सुदैवाने वाचल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास घडली.

भरधाव कारचे टायर फुटले; सुदैवाने वाचला वडील व मुलाचा जीव
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: नागपूरकडून अमरावतीला जात असलेल्या कारचा समोरचा टायर अचानक फुटून झालेल्या अपघातात वडील व मुलगा सुदैवाने वाचल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास घडली.
सविस्तर वृत्त असे की नागपूरवरून अमरावतीच्या दिशेने जात असलेली एम.एच.30 ए झेड 2692 या क्रमांकाची कार भरधाव वेगात जात होती. ती कार तळेगावच्या सत्याग्रही घाटात येताच कारचा समोरील टायर फुटल्यामुळे कार अनियंत्रित होवून विरुद्ध दिशेने आली असता अमरावतीकडून नागपूरकडे जात असलेल्या ट्रेलर क्रं.सी जी.04 जे. बी.3122 ला मागील बाजूस धडकली व रोडच्या खाली फेकली गेली. यावेळी गाडीतून जात असलेल्या वडील व मुलाचा जीव सुदैवाने वाचला. त्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. त्यांना दुसऱ्या वाहनाने उपचाराकरिता नागपूरला रवाना करण्यात आले. त्यांची नावे अद्याप कळू शकलेली नाहीत. पोलीस तपास सुरू आहे.