शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

सावधान...‘फोन पे, गुगल पे’ वरून घातला जातोय गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 5:00 AM

तुमच्या गुगल पे आणि फोन पे अ‍ॅपवर तुम्हाला काही पैसे बोनस मिळाल्याचा मेसेज करून बोनस अपडेट करायचा असल्याचे सांगण्यात येते. कस्टमर केअरकडून फोन येतो, आणि तुम्हाला बोनस म्हणून मिळालेली रक्कम आधी भरून त्यानंतरच तुम्हाला बोनसची रक्कम मिळेल, असे आमिष दिल्या जाते. आमिषाला बळी पडून नागरिक ऑनलाईन फॉर्मवर आपली संपूर्ण माहिती आणि बोनस ची मिळालेली रक्कम टाकतो. नागरिकांची संपूर्ण गोपनीय माहिती घेऊन सायबर भामटे त्यांच्या खात्यातून ती रक्कम काढून घेत त्यांची फसवणूक करतो.

ठळक मुद्देसहा व्यक्तींची फसवणूक : सायबर सेलकडे शेकडोवर तक्रारी दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ‘फोन पे, गुगल पे’वर बोनस मिळाल्याचा मेसेज पाठवून खात्यांची संपूर्ण गोपनीय माहिती घेऊन युपीआय ट्रान्झॅक्शनद्वारे सायबर भामट्यांकडून नागरिकांना गंडविण्याचे प्रकार सुरू आहे. मंगळवारी एकाच दिवशी सायबर भामट्यांनी सहा जणांना एकूण ६४ हजार रूपयांनी गंडविल्याची तक्रार सायबर सेलकडे प्राप्त झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी फोन पे, गुगल पेवर ‘बोनस’ मिळाल्याच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन सायबर सेलद्वारा करण्यात येत आहे.लॉकडाऊन काळात ऑनलाईन गंडा घालण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक तक्रारी सायबर सेलकडे प्राप्त होत आहे. त्यामुळे कोणत्याही मेसेजला उत्तर न देता गोपनीय माहिती देऊ नये, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.सर्वसामान्य नागरिकांना विविध पद्धतीने ऑनलाईन गंडा घालण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. ओएलक्स, पेटीएम आणि आता फोन पे आणि गुगल पे अ‍ॅपवर बोनस मिळाल्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून गोपनीय माहिती घेऊन त्यांच्या अ‍ॅपवरुन युपीआय ट्रन्झॅक्शनद्वारा लाखो रुपये उकळण्याचे काम सुरु आहे.गुगल पे आणि फोन पे अ‍ॅपवर बोनस मिळाल्याचा मेसेज पाठवून त्यांच्या खात्याची गोपनीय माहिती घेऊन तब्बल सहा व्यक्तींची फसवणूक केल्याच्या तक्रारी सायबर सेलकडे प्राप्त झाल्या.सायबर भामट्यांनी सुमीत तिमांडे यांची ३ हजार ७००, इंद्रजित बच्छराज राम यांची ३० हजार, संजिवनी नामक महिलेची ५ हजार, दांडेकर नामक युवकाचे ५ हजार ६००, आशिष पेठे यांची ४ हजार २०० तर आकाश सुखदेवे यांची १५ हजार ६०० रुपयांनी फसवणूक केली.विशेष म्हणजे यासर्वांना बोनस मिळाल्याचे सांगून त्यांच्या खात्याची माहिती घेऊन फसवणूक करण्यात येत आहे. सायबर भामटे विविध शक्कल लढवून नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करीत आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक सावध राहण्याची गरज असून अशा भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन सायबर सेलकडून करण्यात येत आहे.असा घातला जातो गंडातुमच्या गुगल पे आणि फोन पे अ‍ॅपवर तुम्हाला काही पैसे बोनस मिळाल्याचा मेसेज करून बोनस अपडेट करायचा असल्याचे सांगण्यात येते. कस्टमर केअरकडून फोन येतो, आणि तुम्हाला बोनस म्हणून मिळालेली रक्कम आधी भरून त्यानंतरच तुम्हाला बोनसची रक्कम मिळेल, असे आमिष दिल्या जाते. आमिषाला बळी पडून नागरिक ऑनलाईन फॉर्मवर आपली संपूर्ण माहिती आणि बोनस ची मिळालेली रक्कम टाकतो. नागरिकांची संपूर्ण गोपनीय माहिती घेऊन सायबर भामटे त्यांच्या खात्यातून ती रक्कम काढून घेत त्यांची फसवणूक करतो.युपीआय ट्रान्झॅक्शन असल्याने पैसे मिळण्यास अडचणीसायबर भामट्यांनी नवी शक्कल लढविली असून ते आता नागरिकांना गुगल पे आणि फोन पेअ‍ॅपवर बोनस रक्कम मिळाल्याचे सांगून त्यांना गंडा घालीत आहे. पण, नागरिक स्वत: युपीआयद्वारा पैसे पाठवित असल्याने बँक याला जबाबदार नसल्याने फसवणुकीत गेलेले पैसे परत मिळण्यासासाठी अडचणी निर्माण होत आहे.सायबर सेलकडून पाठपुरावा सुरूलॉकडाऊनकाळात मोठ्या प्रमाणात नागरिकांना सायबर भामट्यांनी गंडविल्याच्या तक्रारी सायबर सेलकडे प्राप्त झाल्या आहे. मंगळवारी सहा व्यक्तींची फसवणूक झाली असून त्यांचे पैसे परत मिळविण्यासाठी सायबर सेलने संबंधित बँकेशी पत्रव्यवहार केला आहे. नागरिकांचे पैसे परत आणण्यासाठी सायबर सेलचे दिनेश बोथकर, नीलेश कट्टोजवार, अक्षय राऊत हे पाठपुरावा करीत आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमgoogle payगुगल पे