हस्ताक्षरांतील सुंदरता होतेय लुप्त
By Admin | Updated: January 29, 2015 23:13 IST2015-01-29T23:13:13+5:302015-01-29T23:13:13+5:30
तंत्रज्ञान, आॅनलाईन व मोबाईलच्या युगात इंटरनेटच्या अतिवापरामुळे सुंदर हस्ताक्षर काढण्याची कला लोप पावते की काय, अशी चिंता कला शिक्षकांना वाटू लागली आहे. ही कला टिकवून

हस्ताक्षरांतील सुंदरता होतेय लुप्त
तुळजापूर (व़) : तंत्रज्ञान, आॅनलाईन व मोबाईलच्या युगात इंटरनेटच्या अतिवापरामुळे सुंदर हस्ताक्षर काढण्याची कला लोप पावते की काय, अशी चिंता कला शिक्षकांना वाटू लागली आहे. ही कला टिकवून ठेवण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे झाले आहे़ कला शिक्षकांनी हस्ताक्षराचे अधिक तास घेऊन शाळेत सुंदर अक्षर हा दागिना म्हणून जतन करणे गरजेचे झाले आहे़
अति प्राचीन काळापासून म्हणजे अगदी संत-महंतांच्या काळापासून काही काव्य, भारूड, ऐतिहासिक पत्रे लोकगीते आदी वाड़मय प्रकार स्वरूपाचे हस्तलिखाण केले जात होते़ एखाद्या व्यक्तीकरवी सुंदर हस्ताक्षर लिहून जतन करून ठेवले जात होते़ यासाठी शाई आणि बोरूचा वापर केला जात होता़ आताच्या बॉलपेनच्या युगात मुलांना शाईपेनचा विसर पडत चालला आहे. सुंदर हस्ताक्षर हा विद्यार्थ्यांचा अनमोल ठेवा आहे. अक्षरं सुंदर असल्यास शिक्षकच नव्हे तर मित्र, मैत्रिण, नातेवाईक, उत्तरपत्रिका तपासणारे परीक्षक त्याच्या अक्षरावर प्रसंगी त्याच्या विद्वत्तेवर प्रेम करतात़ एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर कसे सुधारेल, त्याचा हा दागिना कसा टिकून राहील, यासाठी कलाशिक्षक त्यांना चांगलेच राबवून घेताना दिसत होते; पण ते आज दिसत नसून कालबाह्य होऊ पाहत आहे़ या धकाधकीच्या जीवनचक्रात सुंदर हस्ताक्षर जिवंत राहावे म्हणून शहराच्या मध्यभागी हस्ताक्षरे सुधारवर्ग घेतले जातात़ यात विद्यार्थ्यांकडून वारेमाप शुल्क घेऊन बालक-पालकांची गोची केली जाते; पण यातून ते इच्छा पूर्ण करीत आहे.
आधुनिक लिखाणाच्या साधनांमुळे सर्व स्वलेखन विसरून भोगवादाकडे वळले आहेत़ हा चिंतेचा विषय आहे़ विज्ञान युगात वेगवेगळे आधुनिक शोध लागतात़ इंटरनेट, लॅपटॉप, संगणक, टायपिंग, टचस्क्रीन लॅपटॉप यासह अन्य साधनांचा वापर विद्यार्थ्यांपासून तर अधिकारी वर्गापर्यंत होताना दिसतो़ यामुळे स्वत: लिखाण करण्याचा सराव खुंटला आहे़ साधा अर्ज लिहायचा झाल्यास आधुनिक साधनांचा वापर करून पैसे मोजून वेळ मारून नेली जाते़ यात ग्रामीण बालक-पालकांची गोची होते़ या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कला शिक्षक व शाळांनीही या विषयावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे़(वार्ताहर)