महापुरूषांच्या पुतळ्यांचे सौंदर्यीकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 00:03 IST2018-01-11T00:03:08+5:302018-01-11T00:03:20+5:30
शहरात विविध ठिकाणी महापुरुषांचे पुतळे असून त्याच्या सौंदर्यीकरणाकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. अनेकांचे प्रेरणा स्थान असलेल्या विविध महापुरुषांच्या पुतळ्यांचे सौदर्यीकरण करण्याचे काम तात्काळ न.प. प्रशासनाने हाती घ्यावे, अशी मागणी प्रहारच्यावतीने करण्यात आली आहे.

महापुरूषांच्या पुतळ्यांचे सौंदर्यीकरण करा
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरात विविध ठिकाणी महापुरुषांचे पुतळे असून त्याच्या सौंदर्यीकरणाकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. अनेकांचे प्रेरणा स्थान असलेल्या विविध महापुरुषांच्या पुतळ्यांचे सौदर्यीकरण करण्याचे काम तात्काळ न.प. प्रशासनाने हाती घ्यावे, अशी मागणी प्रहारच्यावतीने करण्यात आली आहे. तसे निवेदन नगराध्यक्ष अतुल तराळे यांना प्रहारच्यावतीने देण्यात आले आहे.
शहरातील प्रत्येक पुतळ्यासमोर त्या त्या महापुरूषांच्या नावाचे फलक लावण्यात यावे. शिवाय पुतळा परिसरात विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांची मोठाली फलक असून ती सुंदर शहराच्या उद्देशाला बाधा ठरणारी असून तात्काळ ती काढण्याची कार्यवाही करण्यात यावी. शहरातील सर्व पुतळ्यांची स्वच्छता करण्याच्या उद्देशाने विशेष मोहीम हाती घेऊन ती पालिका प्रशासनाने प्रभावीपणे राबवावी. विविध महापुरुषांच्या पुतळ्याच्या परिसरात कुठलाही जाहिरातींचा व शुभेच्छा संदेश देणारा फलक लावण्यास प्रतिबंध करण्यात यावा. शिवाय पालिका प्रशासनाने विविध महापुरुषांचा पुतळा परिसर स्वच्छ रहावा यासाठी प्रयत्न करावे आदी मागण्या निवेदनातून करण्यात आली आहे.
सदर निवेदन नगर पालिका कार्यालयात नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी स्वीकारले. निवेदन देताना प्रहारचे शहर अध्यक्ष विकास दांडगे, इंगळे, भूषण येलेकार, नितेश चातुरकर, विजय सुरकार, चेतन वैद्य, रेवत इंगळे, प्रशील धांदे, पवन धांदे यांच्यासह प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.