शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

आमदार संघावर पत्रकार संघाची ५ धावांनी मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2018 9:28 PM

सीएम चषक स्पर्धेतील शनिवारी पार पडलेल्या क्रिकेट सामन्यात पत्रकाराच्या संघाने आमदार संघाचा पाच धावांनी पराभव केला. विशेष म्हणजे शेवटच्या षटकापर्यंत हा सामना रंगला होता. सदर सामन्यात किशोर मानकर हे सामनावीर ठरले.

ठळक मुद्देसीएम चषक स्पर्धा : किशोर मानकर सामनावीर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सीएम चषक स्पर्धेतील शनिवारी पार पडलेल्या क्रिकेट सामन्यात पत्रकाराच्या संघाने आमदार संघाचा पाच धावांनी पराभव केला. विशेष म्हणजे शेवटच्या षटकापर्यंत हा सामना रंगला होता. सदर सामन्यात किशोर मानकर हे सामनावीर ठरले.आ. डॉ. पंकज भोयर यांच्या उपस्थितीत पत्रकार संघाचे कर्णधार प्रशांत देशमुख व आमदार संघाचे कर्णधार निलेश किटे यांनी नाणेफेक केली. आमदार ११ चे कर्णधार निलेश किटे यांच्या बाजूने नाणेफेकीचा कौल गेला. त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पत्रकार ११ च्यावतीने डावाची सुरुवात रुपेश खैरी व अतुल केळकर यांनी केली; पण गौरव मेघे यांनी पहिल्याच चेंडूवर केळकर यांचा बळी घेत त्यांना तंबूत परत पाठविले. त्यानंतर चेतन वाघमारे फलंदाजिला उतरले. त्यांनी पहिल्याच बॉलवर षटकार खेचत प्रक्षकांकडून कौतुकाची थाप मिळविली. दरम्यान रुपेश खैरी यांना विकेटकिपर वरूण पाठक यांनी स्टम्पिंग करीत आऊट केले. यानंतर १२ धावा काढुन वाघमारे बाद झाले. अजय कुमार व हेमंत गौळकर यांनी संघाचा डाव सावरला; पण अजय कुमार ५ धावा काढून बाद झाले. गजानन गावंडे व हेमंत गौळकर यांनी डाव सावरला. गौळकर यांनी फटके मारत धाव फलक हलता ठेवला. १४ धावांवर ते बाद झाले. त्यानंतर किशोर मानकर यांनी तडाखेबाज फटके लावत पत्रकार संघाची धावसंख्या १० षटकात ८६ वर पोहचवली. मानकर २८ धावा काढून तर गजानन गावंडे १७ धावा काढून नाबाद राहिले. आमदार ११ च्यावतीने फलंदाजीची सुरुवात नगरसेवक गोपी त्रिवेदी व वरूण पाठक यांनी केली. गोपी त्रिवेदी सात धावा काढून बाद झाले. तर अमित पठाण चार धावावर बाद झाले. पवन राऊत व वरूण पाठक यांनी डाव सावरला. एक चोरटी धाव घेण्याच्या नादात राऊत धावबाद झाले. विपीन राऊत यांनी त्यानंतर फलंदाजी करीत सामन्यात रंगत आणली. अंतिम षटकात आमदार ११ ला २७ धावांची गरज होती. विपीन खत्री यांनी ३ षटकार व एक चोका खेचला. तरीही पाच धावांनी आमदार ११ चा पराभव झाला. आमदार ११ कडून गौरव मेघे, अतुल तराळे, प्रदिप ठाकरे, विपीन खत्री, अमित पठाण यांनी तर पत्रकार संघकडून हेमंत गौळकर, चेतन वाघमारे, किशोर मानकर, प्रशांत देशमुख, अतुल केळकर, गजानन गावंडे यांनी गोलंदाजी केली. पत्रकारांच्या संघात प्रशांत देशमुख, किशोर मानकर, गजानन गावंडे, प्रवीण धोपटे, रुपेश खैरी, चेतन वाघमारे, अजय कुमार, हेमंत गौळकर, अतुल केळकर, दिलीप भुजाडे, मनोज गुप्ता तर आमदारांच्या संघात निलेश किटे, अतुल तराळे, नौशाद शेख, प्रदिप ठाकुर, प्रदीप ठाकरे, वरुण पाठक, गौरव मेघे, पवन राऊत, विपीन खत्री, अमित पठाण, गोपी त्रिवेदी, मनीष सुरजूसे यांचा समावेश होता. पंच म्हणून महेश झाटे, रुपेश डायगव्हाणे यांनी काम पाहिजे. यशस्वीतेसाठी सुमित गांजरे, अभिषेक त्रिवेदी, रजत शेंडे आदींनी सहकार्य केले.