शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी डिसेंबरमध्ये आरपारची लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 23:08 IST

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी त्यावर बहिष्कार दर्शविण्यासाठी व विदर्भ राज्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी ११ डिसेंबरला विदर्भ बंदची हाक आम्ही दिली आहे.

ठळक मुद्देवामनराव चटप : विदर्भातील खासदारांचे राजीनामे मागणार

आॅनलाईन लोकमतवर्धा : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी त्यावर बहिष्कार दर्शविण्यासाठी व विदर्भ राज्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी ११ डिसेंबरला विदर्भ बंदची हाक आम्ही दिली आहे. सदर विदर्भ हडताल आंदोलनाच्या पूर्व तयारीसाठी विदर्भातील प्रत्येक तालुक्यात बैठका सुरू झाल्या आहेत. ही विदर्भ राज्यासाठीची आरपारची लढाई असून या आंदोलनादरम्यान आम्ही विदर्भातील सर्व खासदारांना त्यांचे राजीनामे मागणार आहोत, अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते वामनराव चटप यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.चटप पुढे म्हणाले, विरोधात असताना व निवडणुकीच्या कालावधीत विदर्भ वेगळा करू असे आश्वासन देणारे ना. नितीन गडकरी सत्तेत आल्यापासून चूप होते. मात्र, नुकतेच त्यांनी वेगळे राज्य होण्यासाठी विदर्भ सक्षम नसल्याचे प्रतिपादन केले आहे. विदर्भाच्या वाट्याचा पैसा नेहमीच पश्चिम महाराष्ट्राने पळविला. त्यामुळे खºया अर्थाने विदर्भाचा विकास झाला नाही हे वास्तव आहे. असे असले तरी सध्या स्थितीत ४ लाख ७४ हजार ४०० कोटींचे कर्ज असलेला महाराष्ट्र तरी सक्षम आहे काय, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.नक्षलग्रस्त भागात ९८४ जणांचे मृत्यू झाले. त्यात पोलीस, नक्षलवादी व सर्वसामान्य नागरिकांचा समावेश आहे. नोकरीसाठी विदर्भातील अनेक नागरिक स्थानांतरीत झाले आहेत. त्याचा परिणाम म्हणजे विदर्भातील चार आमदार व एक खासदार कमी झाले. ज्या ठिकाणी कापसाचा शोध लागला त्याच वºहाड भागात सर्वाधिक शेतकºयांनी आत्महत्या केल्याचे वास्तव असल्याने हा भाग सध्या शेतकरी आत्महत्याचे केंद्र म्हणून ओळखल्या जात आहे. २६ पैकी २३ खनिज विदर्भात आहे. शिवाय ५४ टक्के वनजमीन विदर्भात आहे;पण त्याचा खरा लाभ विदर्भा शिवाय दुसºयांनीच घेतल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. विदर्भातील शेतकरी आत्महत्या या विषयावर लोकसभेत झालेल्या चर्चेत एका खासदाराने विदर्भातील शेतकऱ्यांबाबत आक्षेपार्ह विधान केले. यावेळी विदर्भातील एकाही खासदाराने त्याला प्रतीउत्तर दिले नाही. ही निंदनिय बाब असून त्यामुळे आम्ही आंदोलनादरम्यान विदर्भातील सर्व खासदारांना त्यांचे राजीनामे मागणार आहो. गत सात वर्षांपासून अनुकंपाची नोकर भर्ती बंद आहे. शिवाय पगार देण्यासाठी पैसेच नसल्याने उच्च न्यायालयातील ४३८ पदे रिक्त आहे. वेगळे विदर्भ राज्य झाले पाहिजे ही विदर्भातील नागरिकांची मागणी आहे. त्यासाठी आम्ही ११ डिसेंबरला विदर्भ बंदची हाक दिली आहे. या आंदोलनाला विदर्भ माझा, विदर्भ राज्य आघाडी, जनसुराज्य पार्टी व विदर्भ गण परिषदेने पाठींबा दिला आहे. या आंदोलनात विदर्भातील व्यापारी संघटनांनी, शेतकऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी वामनराव चटप यांनी केले. पत्रकार परिषदेला माजी आमदार सरोज काशीकर, निळकंठ घवघवे, राम नवले, अभिजीत लाखे, सतीश दाणी, गंगाधर मुटे, अरविंद राऊत, जि.प. सदस्य गजानन निकम आदींची उपस्थिती होती.