भारत विरूद्ध बांगलादेश क्रिकेट सामन्यावर सट्टा; एकाला अटक

By Admin | Updated: June 17, 2017 00:39 IST2017-06-17T00:39:56+5:302017-06-17T00:39:56+5:30

इंग्लड येथे सुरू असलेल्या आयसीसी चॅम्पीयन्स ट्रॉफी दरम्यान झालेल्या भारत विरूद्ध बांगलादेश क्रिकेट सामन्यावर

Batting against Bangladesh in Bangladesh One arrested | भारत विरूद्ध बांगलादेश क्रिकेट सामन्यावर सट्टा; एकाला अटक

भारत विरूद्ध बांगलादेश क्रिकेट सामन्यावर सट्टा; एकाला अटक

७३ हजारांचा मुद्देमाल जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : इंग्लड येथे सुरू असलेल्या आयसीसी चॅम्पीयन्स ट्रॉफी दरम्यान झालेल्या भारत विरूद्ध बांगलादेश क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या एकाला अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी रात्री आर्वी पोलिसांनी केली. या कारवाईत पोलिसांनी ७३ हजार १२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कृष्णा विजयकुमार बजाज (२४) रा. घाटेशास्त्री वॉर्ड, आर्वी असे अटकेत असलेल्या आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलीस सुत्रानुसार, आर्वी येथील कृष्णा बजाज याच्याघरी भारत विरूद्ध बांगलादेश क्रिकेट सामन्यावर सट्टा सुरू असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी त्याच्या घरावर धाड घातली असता कृष्णा मोबाईल फोनवरुन ग्राहकांशी संपर्क करून ग्राहकांची नावे व रुपयांची आकडेवारी एका कागदावर लिहून बेटींगची भावबाजी करीत असताना मिळून आला. यावेळी त्याच्या अंगझडतीतून व घरझडतीतून तीन कागदाचे तुकडे, लॅपटॉप, एक टीव्ही, सेट टॉप बॉक्स, चार्जर, कॉड व रिमोटर, एक कॅलक्युलेटर, नऊ मोबाईल, तीन चार्जर व रोख ४ हजार ७२० रुपये असा एकूण ७३ हजार १२५ रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी व्ही.व्ही. कानडे व पोलीस निरीक्षक चौधरी यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक संदीप हिवाळे, जमादार अमित जुवारे, गजानन लामसे, राजेश राठोड, गजानन वडनेरकर, विशाल मडावी, गजानन जुमडे, राजेश क्षिरसागर, रवी अवचारे यांनी केली.

Web Title: Batting against Bangladesh in Bangladesh One arrested