सुशीला नायर यांच्या जीवनावर ‘बापू की बेटी’ हा लघुपट

By Admin | Updated: December 15, 2014 23:01 IST2014-12-15T23:01:47+5:302014-12-15T23:01:47+5:30

१० ते ११ वर्षांपासून मी कस्तुरबा आरोग्य संस्थेत कामानिमित्त येत असते. डॉ. सुशीला नायर ज्यांना सर्वजण आदराने बडी बहणजी म्हणत. त्यांच्या बद्दल संस्थेतील सर्वजण भरभरून बोलतात,

'Bapu Ki Beti' is a short film on the life of Sushila Nayar | सुशीला नायर यांच्या जीवनावर ‘बापू की बेटी’ हा लघुपट

सुशीला नायर यांच्या जीवनावर ‘बापू की बेटी’ हा लघुपट

जन्मशताब्दी वर्ष : सेवाग्राम आश्रमात झाले चित्रीकरण
दिलीप चव्हाण - सेवाग्राम
१० ते ११ वर्षांपासून मी कस्तुरबा आरोग्य संस्थेत कामानिमित्त येत असते. डॉ. सुशीला नायर ज्यांना सर्वजण आदराने बडी बहणजी म्हणत. त्यांच्या बद्दल संस्थेतील सर्वजण भरभरून बोलतात, यामुळे मी सुद्धा विचार करू लागले. खूप ऐकले, वाचायला सुरुवात केली. आणि बडी बहणजी या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची ओळख व्हायला लागली. तरुणी असल्यापासून त्या बापूंच्या सानिध्यात आल्या. पुढे त्यांना बापूंच्या कार्याला आपलं माणत आरोग्य ते स्वातंत्र्य चळवीत खंभीरपणे काम केलं. बापूंच्या सहवासातून स्वातंत्र्यनंतरही त्यांनी आपले कार्य अखंडीत पणे चालू ठेवले. खरोखरच त्या बापूंची बेटी होत्या, म्हणून या लघूपटाला आम्ही ‘बापू की बेटी’ हे नाव दिलं. असे चित्रपट निर्माती वर्षा देशपांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
वर्षा देशपांडे या मुंबईच्या असून त्या स्वत: डॉ. सुशीला नायर यांची महिला अवस्था ते मृत्यूपर्यंतची भूमिका पार पाडणार आहेत. त्यांची आधार समाजसेवी बहुउद्देशिय संस्था (मलकापूर) येथे असून कस्तुरबा आरोग्य संस्था अशा दोन संस्थेंतर्गत हा लघुपट बनविण्यात येत आहे.
वर्षा देशपांडे म्हणाल्या, या लघुपटात बहणजीच्या विविध पैलूवर प्रकाश टाकण्यात येणार आहे. वास्तविक त्यांचे कार्य अफाट असून विचार, आचारण व बापूंवरील श्रद्धा त्यांनी प्रत्यक्षात साकार केली. बापूंसोबतचे जीवन आणि स्वातंत्र्यनंतरचे त्यांचे जीवन, विचारात तसूभरही पण फरक पडला नाही. ग्रामीण भागातील लोकांना आरोग्य सेवेचे व्रत अखंडपणे चालू ठेवले. आश्रमात त्याचं स्वरूप लहान होते. पण त्यांच्या ज्ञानाचा फायदा व्हावा यासाठी आरोग्याची जबाबदारी गांधीजींनी त्यांच्यावर सोपविली. विशेष म्हणजे त्यात त्या खऱ्या उतरल्या. बापूंच्या शब्दा पलिकडे त्यांच्यासाठी काहीच नव्हते.
बहनजींचे मोठे भाऊ प्यारेलाल गांधीजींसोबत होते. लाहोर आताचे पाकिस्तानमधील या ठिकाणी बालवयात बहणजींनी बापूंना पाहिले. पुढे आश्रमातील जीवन १९४२ चे चले जाव आंदोलन आणि बापू यांच्या सोबत २१ महिने आगाखॉ पॅलेसमध्ये राहण्याची संधी मिळाली. स्वातंत्र्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्री कस्तूरबा दवाखाना ते महात्मा गांधी आयुर्विज्ञानच्या कार्यातून ग्रामीण क्षेत्रातील कामाचाही समावेश यात आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शन जयंत जीवन करीत असून संगीत मोरेश्वर निस्ताने व मायाताई मोटेगावकर यांनी दिले. मैथलीशरण गुप्ता यांच्या प्रार्थना, श्लोक बापूंचे प्रिय व बहनजींना आवडणाऱ्या भजनांचा यात समावेश करण्यात आला आहे. २६ डिसेंबर हा जन्म दिवस, १०० वर्ष पूर्ण होत असल्याने हा लघुपट समर्पित आहे. संस्थेचे सहकार्य उत्तम असल्याचे वर्षा देशपांडे यांनी सांगितले .

Web Title: 'Bapu Ki Beti' is a short film on the life of Sushila Nayar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.