शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

बँकांनी शेतकऱ्यांची अडवणूक करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 11:07 PM

केंद्रात व राज्यात भाजपाचे शासन असून आम्ही कर्जमुक्तीबाबत शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळत आहो. शासनाने शेतकऱ्यांसाठी विविध योजना कार्यान्वित केल्यात; पण शासकीय यंत्रणा योजनांची योग्य अंमलबजावणी करीत नाही.

ठळक मुद्देरामदास तडस : पीक कर्ज मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : केंद्रात व राज्यात भाजपाचे शासन असून आम्ही कर्जमुक्तीबाबत शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळत आहो. शासनाने शेतकऱ्यांसाठी विविध योजना कार्यान्वित केल्यात; पण शासकीय यंत्रणा योजनांची योग्य अंमलबजावणी करीत नाही. काँगे्रस शासन काळात कर्ज वाटपात गैरप्रकार झाला. मोठ्या भांडवलदारांना दोनशे कोटीच्या कारखान्यासाठी हजार कोटींचे कर्ज या बँक अधिकाऱ्यांनी दिले; पण भाजप शासनाने शेतकरी कर्जमुक्तीचे आदेश दिले असताना बँक अधिकारी गरीब शेतकऱ्यांची अडवणूक करीत आहे. बँकाचे लालफितशाही धोरण शेतकºयांच्या कर्जमुक्तीत अडसर ठरत आहे. बँकांनी शेतकऱ्यांची अडवणूक करू नये, असा गंभीर इशारा खा. रामदास तडस यांनी दिला.स्थानिक आर.के. हायस्कूलच्या सभागृहात शेतकरी पीक कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. खा. तडस पूढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजना शासनाने सुरू केली. या योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी ९८ हजार ४५५ अर्ज आले. पैकी ६६ हजार १०१ ग्रिनलिस्ट मध्ये आलेले शेतकरी आहे. त्यांच्या कर्जमाफीसाठी ४८५ कोटी मंजूर झाले; पण यापैकी केवळ ४४ हजार १८७ शेतकऱ्यांच्या खात्यात २६० कोटी जमा आहे. ३२,३५४ अर्जाबाबत कुठलीही माहिती नाही. २१,९१४ शेतकऱ्यांची कर्जमाफीची रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली नाही. बँकांनी शेतकऱ्यांची अडवणूक न करता शेतकऱ्यांना सहकार्य करावे, असेही ते म्हणाले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, जि.प. कृषी सभापती मुकेश भिसे, प्रभारी तहसीलदार भागवत, जि.प. सदस्य प्रवीण सावरकर, जयंत येरावार, गजानन राऊत, दीपक फुलकरी उपस्थित होते. संचालन विनोद माहुरे यांनी केले तर आभार उपसभापती किशोर गव्हाळकर यांनी मानले. यावेळी नितीन बडगे, कपील शुक्ला यासह शेतकरी व बँक अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरी