शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
3
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला पूर्ण; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
4
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
5
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
6
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
7
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
8
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
9
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
10
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
11
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
12
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
13
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
14
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
15
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
16
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
17
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
18
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
19
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
20
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेने मांडला लेखा-जोखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 22:01 IST

मागील दोन वर्षाच्या कार्यकाळात वर्धा नगर पालिकेअंतर्गत करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा लेखा-जोखा ‘दोन वर्ष वर्धा शहराच्या विकासाची’ या पुस्तिकेचे विमोचन राज्याचे वित्त नियोजन व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच पंतप्रधान आवास योजने अंतर्गत बांधण्यात आलेल्या नगराचे श्रध्देय अटलबिहारी वाजपेयी नगर असे नामकरण करण्यात आले.

ठळक मुद्देमुनगंटीवार यांच्या हस्ते विमोचन : अटलबिहारी वाजपेयी नगराचे नामकरण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील दोन वर्षाच्या कार्यकाळात वर्धा नगर पालिकेअंतर्गत करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा लेखा-जोखा ‘दोन वर्ष वर्धा शहराच्या विकासाची’ या पुस्तिकेचे विमोचन राज्याचे वित्त नियोजन व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच पंतप्रधान आवास योजने अंतर्गत बांधण्यात आलेल्या नगराचे श्रध्देय अटलबिहारी वाजपेयी नगर असे नामकरण करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार रामदास तडस होते. यावेळी मंचावर आमदार प्रा. अनिल सोले, आमदार डॉ. रामदास आंबटकर, आमदार डॉ. पंकज भोयर, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, नगराध्यक्ष अतुल तराळे, उपाध्यक्ष प्रदिपसिंह ठाकुर, मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे आदी उपस्थित होते. विशेष वैशिष्ट पुर्ण निधी २०१५-१६ अंतर्गत वर्धा शहरातील खुल्या जागेच्या विकासावर ५ कोटीचा निधी खर्च करण्यात आला. याअंतर्गत क्रिंडागण व बगीच्यामध्ये हरितक्षेत्र विकास करण्याच्या कामाचे लोकार्पण करण्यात आले.पावडे चौक ते दादाजी धुनिवाले मठ नागपूर रोड पर्यंत रस्त्याचे रूंदीकरण व सिमेंटीकरण याच मार्गावर मध्यभागी पोलसह एलएडी लाईटस लावून विद्युतीकरण करण्याचे काम, जिल्हा न्यायालय वर्धा समोरील शासकीय जागेवर हॉकर्स प्लाझाचे बांधकाम अशा एकूण ३० कोटी रूपयाच्या कामाचे लोकार्पण ना. मुनगंटीवार यांच्याहस्ते करण्यात आले.या शिवाय शहरातील बजाज चौक ते राठी एजन्सीपर्यंत रस्त्यावरील दुभाजक सौंदर्यीकरण, नगर परिषद प्रशासकीय इमारतीचा दुसरा माळा बांधकाम, कुंपनभिंत, पार्किंग शेड,वाहन शेड लॅन्ड स्पेपिंग, फायर विभाग इलेक्ट्रीकचे काम, विशेष अनुदान अंतर्गत शहरातील १८ खुल्या जागेत व दुभाजक मध्ये हरितपट्टे विकसीत करणे, विविध प्रभागातील रस्त्याचे काँक्रीटीकरण, पेव्हमेंट लावणे, व पुलांच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.त्याचप्रमाणे घनकचरा व्यवस्थापनअंतर्गत वाहन शेड, जलतरण तलाव व जुने मुख्याधिकारी निवास येथील संरक्षक भिंत व काँक्रीट नाली, रस्त्याचे डांबरीकरण व शौचालयाचे बांधकाम, १४ वा वित्त आयोग घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत इंझापूर येथील घनकचरा प्रक्रिया केंद्राकरीता कुंपनभिंत, चेन लिंक, फेन्सिंग व रस्ता बांधकाम अशा अनेक विकास कामांचा प्रारंभ वित्त, नियोजन व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला.