शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज पुनर्गठनासाठी बँकेत रांगा

By admin | Updated: June 20, 2016 01:59 IST

शेतीचा हंगाम तोंडावर आल्याने शेतकरी बियाणे, खते आदी जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ करीत आहेत.

शेतकऱ्यांची लगबग : नंदोरी येथील बँक शाखा रविवारीही सुरूनारायणपूर : शेतीचा हंगाम तोंडावर आल्याने शेतकरी बियाणे, खते आदी जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ करीत आहेत. आतापर्यंत बँक आॅफ महाराष्ट्र शाखा नंदोरीने पुनर्गठण प्रक्रिया सुरू केली नव्हती; पण नव्याने आलेले प्रभारी व्यवस्थापक एस.के. भट्टाचार्य यांनी तीन दिवसांपासून पुनर्गठन प्रक्रियेला वेग दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांचीही गर्दी होत असल्याचे दिसते. सकाळी ८ वाजताच बँकेच्या आवारात शेतकऱ्यांच्या रांगा लागत असल्याचे दिसते.गतवर्षीचा दुष्काळ लक्षात घेता शासनाने शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण करण्याचे आदेश दिले. यामुळे बँकांनी शेतकऱ्यांच्या जुन्या कर्जाचे हप्ते पाडून देत नवीन कर्ज वाटपास सुरूवात केली होती. असे असले तरी बँक आॅफ महाराष्ट्र नंदोरी येथील कर्ज पुनर्गठण प्रकिया रखडली होती. यामुळे शेतकरीही यासाठी बँकेमध्ये जात नव्हते. तीन दिवसांपूर्वी नंदोरी शाखेत प्रभारी व्यवस्थापक म्हणून एस.के. भट्टाचार्य रूजू झाले आहेत. ते स्वत: बँकेत ९ वाजता येत असून पुनर्गठणाची अधिकाधिक प्रकरणे निकाली काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. कर्ज पुनर्गठण प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती होताच शेतकऱ्यांचीही बँकेत गर्दी होत आहे. परिसरातील खातेदार शेतकरी सकाळी ८ वाजतापासूनच नंदोरी येथील बँक आॅफ महाराष्ट्रच्या आवारात रांगा लावताना दिसून येतात. कर्ज पुनर्गठनाची प्रकरणे अधिक असल्याने त्यांनी रविवारीही बँक सुरू ठेवली. व्यवस्थापक सौरभ भट्टाचार्य हे सर्व कर्मचाऱ्यांसह बँकेत कार्यरत असल्याचे दिसून आले. ही पद्धत पुर्वीपासून अवलंबणे गरजेचे आहे. किमान या शाखा व्यवस्थापकांनी प्रक्रिया नियमित व वेगाने करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.(वार्ताहर)