बँक ऑफ इंडियाचे एटीएम इमारतीमध्ये बंदिस्त

By Admin | Updated: May 29, 2014 02:42 IST2014-05-29T02:42:59+5:302014-05-29T02:42:59+5:30

सुकळी (बाई) येथे बँक ऑफ इंडियाचे एटीएम देण्यात आले आहे; पण ही एटीएम

Bank of India is locked in ATM building | बँक ऑफ इंडियाचे एटीएम इमारतीमध्ये बंदिस्त

बँक ऑफ इंडियाचे एटीएम इमारतीमध्ये बंदिस्त

आकोली : सुकळी (बाई) येथे बँक ऑफ इंडियाचे एटीएम देण्यात आले आहे; पण ही एटीएम मशीन बँकेच्या इमारतीमध्येच असल्याने ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो. सुटीच्या दिवशी वा बँक बंद झाल्यानंतर ग्राहकांना एटीएममधून पैसे काढता येत नाही. यामुळे येथील एटीएम मशीन शोभेची वस्तूच ठरत आहे.

सुटीच्या दिवशी वा बँक बंद झाल्यानंतर ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून बँक ऑफ इंडियाने एटीएम सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली आहे; पण सुकळी (बाई) येथील एटीएम बँक इमारतीच्या आत बंदीस्त आहे. यामुळे ग्राहकांना बँकेच्या वेळेतच एटीएम सुविधेचा लाभ घेता येतो. एरवी बँक बंद असल्यावर एटीएमचा कुठलाही फायदा ग्राहकांना होत नाही. यामुळे ग्राहकांची मोठीच गैरसोय होते. याबाबत ग्राहक ओरड करतात; पण याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसते.(वार्ताहर)

Web Title: Bank of India is locked in ATM building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.