बँकेने कर्जवसुलीला दिली मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 06:00 AM2019-11-06T06:00:00+5:302019-11-06T06:00:21+5:30

आर्वीतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कृषी विकास शाखेने शेतकºयांवर थकीत असलेल्या कृषी कर्ज सक्तीने वसुल करण्याची मोहीम हाती घेतली आहे. यावर्षीच्या निसर्ग कोपामुळे कृषी कर्ज थकले आहे. गृहकर्ज, सोने तारण व ट्रॅक्टर इत्याची कर्जाचे नियमित हप्ते भरत असतानाही त्यांना कृषी कर्जाचे थकबाकीदार दाखवून सक्तीची वसुली केली जात आहे.

Bank extends loan extension | बँकेने कर्जवसुलीला दिली मुदतवाढ

बँकेने कर्जवसुलीला दिली मुदतवाढ

Next
ठळक मुद्देआंदोलनाचा धसका : जगताप यांची सहायक व्यवस्थापकांशी चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : यावर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीला पावसाने विलंबाने हजेरी लावली आणि आता परतीच्या पावसाने पाठ सोडली नाही. परिणामी शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले असतानाही बँकेकडून सक्तीची कर्ज वसुली केली जात आहे. त्यामुळे प्रहार सोशल फोरमचे संस्थापक अध्यक्ष बाळा जगताप यांनी किटकनाशकच्या बॉटल घेऊन शेतकऱ्यांसह स्टेट बँकेच्या क्षेत्र सहाय्यक प्रबंधक कार्यालयात धडक दिली. या आंदोलनाचा धसका घेत प्रबंधक अनिल साटोने यांनी कर्जवसुलीला मुदत वाढ दिली.
आर्वीतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कृषी विकास शाखेने शेतकऱ्यांवर थकीत असलेल्या कृषी कर्ज सक्तीने वसुल करण्याची मोहीम हाती घेतली आहे. यावर्षीच्या निसर्ग कोपामुळे कृषी कर्ज थकले आहे. गृहकर्ज, सोने तारण व ट्रॅक्टर इत्याची कर्जाचे नियमित हप्ते भरत असतानाही त्यांना कृषी कर्जाचे थकबाकीदार दाखवून सक्तीची वसुली केली जात आहे. बँकेकडून शेतकऱ्यांना नोटीसही बजावण्यात आली आहे. यासोबतच शेतकऱ्यांना बँकेडून वारंवार फोन करुन मालमत्ता लिलाव करुन कर्ज वसुली करण्याचीही दमदाटी केली जात असल्याने शेतकरी चांगलेच धास्तावले आहे.
दुष्काळी परिस्थितीत बँक शेतकऱ्यांवर सक्ती करुन आत्महत्येस प्रवृत्त करीत असल्याची ओरड शेतकऱ्यांकडून होत आहे. शेतकºयांची ही समस्या लक्षात घेऊन प्रहार सोशल फोरमचे संस्थापक अध्यक्ष बाळा जगताप यांनी किटकनाशकच्या बॉटल घेऊन पदाधिकारी व शेतकºयांसह बँकेच्या कृषी विभागात धडक दिली. त्यामुळे बँकेत चांगलीच खळबळ उडाली होती. नागपूरचे क्षेत्र सहाय्यक प्रबंधक अनिल साटोने यांच्या पुढे शेतकऱ्यांची परिस्थिती मांडली. त्यांनीही परिस्थिती लक्षात घेऊन सक्तीची कर्ज वसुली थांबवत मुदत वाढ दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले.

Web Title: Bank extends loan extension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.