वर्धा रेल्वेस्थानकावर संशयास्पदरित्या वावरणाऱ्या बांगलादेशी महिलेला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 14:16 IST2018-04-03T14:16:01+5:302018-04-03T14:16:09+5:30
येथे रेल्वेस्थानकावर लोहमार्ग पोलिसांनी फलाट क्रमांक २ वर संशयास्पदरित्या फिरणाऱ्या एका महिलेला अटक केली.

वर्धा रेल्वेस्थानकावर संशयास्पदरित्या वावरणाऱ्या बांगलादेशी महिलेला अटक
ठळक मुद्देलोहमार्ग पोलिसांची कारवाईबनावट मतदान कार्डासह ३०० रुपयांचे बांगलादेशी चलन जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: येथे रेल्वेस्थानकावर लोहमार्ग पोलिसांनी फलाट क्रमांक २ वर संशयास्पदरित्या फिरणाऱ्या एका महिलेला अटक केली. ती महिला बांगलादेशी असल्याचे उघडकीस येऊन तिच्याजवळ ३०० रुपयांचे बांगलादेशी चलन व बनावट मतदान कार्ड आढळले आहे. अटक केलेल्या महिलेचे नाव सलमा अख्तर गाजी असे असून ती साथी छावर असे बनावटी नाव धारण करून मुंबईला जात असल्याचे कळले. ती प. बंगालमार्गे भारतात आल्याचे तिने सांगितले. पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.