चिनी नायलॉन मांजाविक्रेत्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 05:00 AM2020-08-08T05:00:00+5:302020-08-08T05:00:33+5:30

रोहित नामदेव सुपारे (२२) रा. घोराड (सेलू) ह. मु. रानडे प्लॉट, रामनगर असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पतंग उडविण्याकरिता पूर्वीप्रमाणे सुती धागा अथवा तयार केलेल्या मांजाचा वापर केला जात नसून चिनी नायलॉन मांजाचा वापर केला जात आहे. बाजारपेठेतही याच नायलॉन मांजाची खुलेआम विक्री सुरू आहे.

ban on Chinese nylon manza seller | चिनी नायलॉन मांजाविक्रेत्यावर छापा

चिनी नायलॉन मांजाविक्रेत्यावर छापा

Next
ठळक मुद्देघोराडच्या युवकास अटक : रामनगर पोलीस, वनविभागाच्या फिरते पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात पतंगबाजीला उधाण आले असून बंदी घालण्यात आलेल्या चिनी नायलॉन मांजाची बाजारपेठेत खुलेआम विक्री सुरू आहे. याबाबत लोकमतने वृत्तमालिका प्रकाशित केल्यानंतर रामनगर पोलीस आणि वर्धा विनविभागाच्या फिरते पथकाने रामनगरात कारवाई करून मांजा जप्त करीत युवकास अटक केली.
रोहित नामदेव सुपारे (२२) रा. घोराड (सेलू) ह. मु. रानडे प्लॉट, रामनगर असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पतंग उडविण्याकरिता पूर्वीप्रमाणे सुती धागा अथवा तयार केलेल्या मांजाचा वापर केला जात नसून चिनी नायलॉन मांजाचा वापर केला जात आहे. बाजारपेठेतही याच नायलॉन मांजाची खुलेआम विक्री सुरू आहे.
पीपल फॉर अ‍ॅनिमल्सचे आशीष गोस्वामी यांनी रामनगर पोलिसांत तक्रार दाखल करून मांजाची रानडे प्लॉट, रामनगर येथे किरायाच्या घरातून विक्री होत असल्याची माहिती दिली. त्यावरून रामनगर पोलीस आणि वनविभागाच्या फिरते पथकाने रानडे प्लॉटमधील गिरीपुंजे यांच्या मालकीच्या घरी किरायाने घेतलेल्या घरी छापा घालून ५ हजार ५०० रुपये किमतीच्या नायलॉन मांजाच्या नऊ चक्री जप्त केल्या. या प्रकरणार रोहित सुपारे याला अटक करण्यात आली. त्याच्यावर पर्यावरण सुरक्षा अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात आली. ही कारवाई रामनगरचे ठाणेदार धनाजी जळक यांच्या मार्गदर्शनात एसएसआय विनोद राऊत, अझरुद्दिन काझी, राहुल दूधकोहळे, वनविभागाच्या फिरते पथकाचे वसंत खेलकर, वनरक्षक नीलेश राऊत, रूपेश कारोडकर यांनी केली.

पीपल फॉर अ‍ॅनिमल्सचे एसपींना निवेदन
पीपल फॉर अ‍ॅनिमल्सचे सचिव आशिष गोस्वामी, कौस्तुब गावंडे यांनी पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांना निवेदन सादर करीत जीवघेण्या चिनी नायलॉन मांजावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. लोकमतने पाठपुरावा केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

होलसेल स्वरूपाचा होता व्यवसाय
रोहित सुपारे हा मूळचा सेलू तालुक्यातील घोराड येथील रहिवासी असून रामनगरातील रानडे प्लॉटमध्ये भाडे तत्त्वावरील खोलीर राहून नायलॉन मांजा विक्रीचा अवैधरीत्या व्यवसाय करीत होता. त्याचा हा व्यवसाय होलसेल स्वरूपाचा होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: ban on Chinese nylon manza seller

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस