शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

बच्चू कडूंची अशीही धुलवड अन् रंगपंचमी; ZP शाळेत जाऊन केली रंगरंगोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2023 17:05 IST

होळी सणाच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाला मित्र एकमेकांना रंग लावून धुलीवंदन साजर करत असतात

अमरावती/मुंबई - शिंदे गटाचे नेते आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्याकडे सर्वसामान्यांचा पाहण्याचा दृष्टीकोन आजही वेगळाच आहे. आपल्या प्रहार संघटनेच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींसाठी त्यांचं काम मोलाचं आहे. तर, सातत्याने आरोग्यासंबंधी आणि समाजहित लक्षात घेऊन त्यांचं कार्य सुरू असते. आता, होळी व रंगपंचमीनिमित्त त्यांच्या प्रहार संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी महत्वाचं आवाहन केलंय. रंगपंचमीनिमित्त केवळ रंग न खेळता, गावातील झाडं, गावच्या भींती आणि गावच्या शाळा रंगवण्याचा उपक्रम त्यांनी हाती घेतलाय. त्या उपक्रमाची सुरुवातही त्यांनी आजपासून केली. 

होळी सणाच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाला मित्र एकमेकांना रंग लावून धुलीवंदन साजर करत असतात. मात्र, आमदार बच्चू कडू यांनी याच धुलिवंदन दिनी स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. कडू यांनी आईंच्या स्मृतीप्रित्यर्थ मागील वर्षीपासून शाळेच्या रंगोटीचा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचं यावर्षीचा दुसरे वर्ष आहे, त्या निमित्ताने आमदार कडू यांनी आज कुरळपूर्णा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत जाऊन स्वतः रंगरंगोटी केली. आमदार कडू यांच्या उपक्रमाच सर्वत्र कौतुक होत आहे. पुढल्या वर्षी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा प्रमुखांना एक शाळा रंगवण्याचे काम पूर्णत्वास नेण्याकडे प्रयत्नशील राहणार असल्याचे कडू यांनी यावेळी बोलताना म्हटले. 

गतवर्षी माझ्या आईचं निधन झालं होतं, घरात दुखवटा होता आणि त्याच काळात रंगपंचमी आली होती. त्यामुळे, रंगमंपचीला आम्ही कुणीही रंग लावला नाही, रंगपंचमीचा उत्सव साजरा केला नाही. त्याऐवजी सामाजिक बांधिलकी जपत  गाव रंगवलं, झाडं रंगवली, शाळा रंगवल्या. त्यातूनची ही संकल्पना आमच्या डोक्यात आली. त्या संकल्पनेला आता याही वर्षी आकार देण्याचं काम आम्ही करतोय. रंगपंचमी हा सण शाळा रंगवून, गाव रंगवून साजरा करण्याचा आमचा हा मानस यापुढेही वृद्धींगत होईल, असेही बच्चू कडू यांनी म्हटले.  

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाBachhu Kaduबच्चू कडूHoliहोळी 2023wardha-acवर्धा