पर्यावरणाचे संरक्षण करणाऱ्या वृक्षांवर कुऱ्हाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 05:00 IST2020-03-24T05:00:00+5:302020-03-24T05:00:31+5:30
सेवाग्राम येथील मेडिकल चौक परिसरापासून वर्धेकडे जाणाऱ्या मार्गावर दुतर्फा कडूनिंबाची आणि अन्य जातींची मोठी वृक्ष आहेत. गेल्या काही वर्षांपासून ही वृक्ष कुठलाही स्वार्थ न ठेवता मानवासह जिवजंतुंना प्राणवायू देत आहेत. या वृक्षांमुळे या मार्गाच्या सौदर्यातही भर पडली आहे. महात्मा गांधी यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या सेवाग्राम परिसरात त्यांच्या काळापासूनची काही वृक्ष आहेत. त्यांच्या काळानंतरही कार्यकर्त्यांनी काही वृक्ष लावले होते.

पर्यावरणाचे संरक्षण करणाऱ्या वृक्षांवर कुऱ्हाड
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : जग ग्लोबल वार्मिंगच्या विळख्यात असल्याची ओरड होत असतानाच विकासाच्या नावावर मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल केली जात आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण करणाऱ्या वृक्षांअभावी रस्ते भकास होत चालल्याचे चित्र वर्धा ते सेवाग्राम मार्गावर पहावयास मिळत आहे.
सेवाग्राम येथील मेडिकल चौक परिसरापासून वर्धेकडे जाणाऱ्या मार्गावर दुतर्फा कडूनिंबाची आणि अन्य जातींची मोठी वृक्ष आहेत. गेल्या काही वर्षांपासून ही वृक्ष कुठलाही स्वार्थ न ठेवता मानवासह जिवजंतुंना प्राणवायू देत आहेत. या वृक्षांमुळे या मार्गाच्या सौदर्यातही भर पडली आहे. महात्मा गांधी यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या सेवाग्राम परिसरात त्यांच्या काळापासूनची काही वृक्ष आहेत. त्यांच्या काळानंतरही कार्यकर्त्यांनी काही वृक्ष लावले होते. सेवाग्राम विकास आराखडा मंजूर केल्यानंतर विकासात्मक कामाला गती देण्यात आली. रस्त्यांच्या रुंदिकरणासोबत सौदर्यीकरणाच्या कामाला सुरुवात झाल्याने या मार्गावरील डेरेदार वृक्षांवर कुऱ्हाड पडली. सेवाग्राम आणि बापूंचा आश्रम जगासमोर प्रेरणास्थान आहे. परिसर सुशोभित असणे गरजेचे आहे. पण, प्राणवायू देणाऱ्याआणि पर्यावरणाचे संरक्षण करणाऱ्या वृक्षांची कत्तल होत असल्याने पर्यावरणाची चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे या प्रवृत्तीला आळा घालण्याची मागणी होत आहे.
जिल्हा पर्यावरण संरक्षण समितीच्या बैठकीत झाडांना धोका होऊ नये. जी तोडायची असेल त्याची रितसर परवानगी घ्यावी, असा निर्णय घेण्यात आला होता.पण, या मार्गावरील कामात लबाडी केल्याचे दिसून येत आहे. झाडे तोडायची नाही पण, त्यांना मारण्याची उपाययोजना करण्यात आली आहे. बांधकामा दरम्यान झाडांच्या मुळांना धक्का पोहोचविल्याने ती झोड जगणे आता कठीण झाले आहे.
-मुरलीधर बेलखोडे, अध्यक्ष निसर्ग सेवा समिती