कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांकडून जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2022 05:00 IST2022-01-13T05:00:00+5:302022-01-13T05:00:26+5:30
जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचे डेल्टा व्हेरिएंट असलेले रुग्ण झपाट्याने वाढत चालले असतानाच पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करण्याबाबत माहिती देताना दिसून येत आहे. रामनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार हेमंत चांदेवार यांच्या मार्गदर्शनात मंगळवारी रात्रीच्या सुमारास आर्वी नाका चौकात पोलीस वाहनातून कोरोना नियम पाळण्याबाबत ध्वनिक्षेपकाद्वारे सांगण्यात आले.

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांकडून जनजागृती
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्यासाठी रामनगर पोलिसांकडून पोलीस वाहनातून आर्वी नाका परिसरातील नागरिकांना सूचना देत कोरोना नियम पाळण्याबाबतची जनजागृती करण्यात आली.
जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचे डेल्टा व्हेरिएंट असलेले रुग्ण झपाट्याने वाढत चालले असतानाच पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करण्याबाबत माहिती देताना दिसून येत आहे. रामनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार हेमंत चांदेवार यांच्या मार्गदर्शनात मंगळवारी रात्रीच्या सुमारास आर्वी नाका चौकात पोलीस वाहनातून कोरोना नियम पाळण्याबाबत ध्वनिक्षेपकाद्वारे सांगण्यात आले.
यावेळी नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवावे, जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करून दिवसा पाचपेक्षा जास्त लोकांनी परवानगीशिवाय एकत्र येऊ नये, रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडू नये, सर्वांनी मास्क घालावे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, अन्यथा ५०० रुपये दंड किंवा गुन्हा दाखल करण्यात येईल. रात्री १० वाजता दुकान बंद करावे, दुकानात गर्दी करू नये तसेच तहसीलदारांच्या परवानगीशिवाय कोणतेही कार्यक्रम आयोजित करू नये, अशा सूचना पोलीस वाहतातील पीए सिस्टीमद्वारे अनाऊन्समेंट करून सांगण्यात आले.
नियम पाळण्यास हयगय केल्यास होणार कायदेशीर कारवाई
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णसंख्या पुन्हा झपाट्याने वाढत चालली असतानाच जिल्हा प्रशासन पुन्हा कोरोना विषाणूचा प्रभाव रोखण्यासाठी रस्त्यावर उतरली आहे. नगर पालिकेच्या पथकांकडूनही नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत असून विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईचा दंडुका उगारण्यात येत आहे. असे असताना आता पोलिसांकडूनही नागरिकांमध्ये जनजागृती केली जात असून कोरोना नियमांचे पालन न केल्यास थेट कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती चांदेवार यांनी दिली.