लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : भूमीचे आरोग्य बिघडल्याने जल संचयाची गरज आहे. यासाठी नदीपासून तर गावातील छोट्या तलावात जलसंग्रह कसा करता येईल, त्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजे. स्वातंत्र्यानंतर देशात महाराष्ट्र यावर काम करणारे पहिले राज्य ठरले आहे. मात्र, समस्या कमी झालेल्या नाहीत. भविष्यातील गरज व समस्या लक्षात घेता जलसाक्षरता आवश्यक असल्याचे प्रतिपादन जलपुरुष राजेंद्रसिंह राणा यांनी केले.नयी तालिम समितीच्या शांती भवनामध्ये जलसंपदा विभाग, जलसाक्षरता केंद्र, यशदा पुणे अंतर्गत राज्यस्तरीय जलसाक्षरता कार्यशाळेचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी डॉ. दिलीप कुलकर्णी, मोहन हिराबाई हिरालाल, यशदाचे कार्यकारी संचालक आनंद पुसावळे व डॉ. सुमंत पांडे उपस्थित होते.बापू,माँ-बाबा यांच्या प्रतिमेला अभिवादन करून दीप प्रज्वलन आणि जलपूजन करण्यात आल्यानंतर गंगा की अविरता की मांग पुरी नहीं हुई व आपले आदर्श गाव या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.राजेंद्रसिंह म्हणाले, ज्या महाराष्ट्रात जलसाक्षरतेवर काम झाले, त्याच महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यासुद्धा झालेल्या आहेत, हे विचार करण्यासारखे आहे. पाण्यावर कुणाची मालकी नाही. मानव, वने, असंख्य जीवजंतू या सर्वांचा अधिकार आहे. पण याचे खासगीकरण व व्यापार होत आहे. पाण्याचे आरोग्य बिघडविण्याचे काम मानवाने नाही तर बुद्धीने केले आहे. कारण बुद्धीच लोभीपणा निर्माण करते. या बुद्धीला अनुशासित केले पाहिजे. यासाठी आपल्याला जैवविविधतेकडे जावे लागेल. नागपूर येथे ब्यूरोलिया इंडिया या कंपनीने वॉटर सर्व्हिसच्या नावावर पाणी दिले. लोकसहभाग वाढवून काम करावे लागेल. अन्यथा येणारी पिढी पाण्यावर प्रश्न करेल. महाराष्ट्राला पाणीदार बनविण्यासाठी सर्वसमावेशक प्रयत्न झाले पाहिजे, असे राजेंद्रसिंह म्हणाले.डॉ. दिलीप कुलकर्णी यांनी जलसाक्षरता हा व्यापक विषय असून यातील केवळ पाणीच असा होत नाही तर याचा संबंध पर्यावरण, जल, जमीन आदींशीसुद्धा येतो. आकाशातून पडणारे पाणी जमिनीवर पडते. पाने, भूगर्भ यात सामावून जाते. तेव्हाच जलसाठा होत असतो. पण विखंडित विचार व कार्यप्रणालीमुळे पाणी संग्रहित झाले नाही. केवळ वारेमाप उपयोग केला. याचाच परिणाम भीषण समस्येत दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले.वन हे तो जल है,जल है तो कल है हा नारा देऊन सर्व काही सरकारने करावे, असे केंद्रित व्यवस्था झाली असल्याचे मोहन हिराबाई हिरालाल म्हणाले. संचालन वर्धा पाटबंधारे विभागच्या योगीता सोरते यांनी केले. कार्यशाळेत महाराष्ट्रातील १३५ प्रतिनिधी सहभागी. दुसऱ्या सत्रात ज्ञानेश्वर बोडखे, बारापात्रे, डॉ. सुमंत पांडे यांनी विचार मांडले.
जलसाक्षरतेविषयी जागर, लोकसहभाग आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 06:00 IST
नयी तालिम समितीच्या शांती भवनामध्ये जलसंपदा विभाग, जलसाक्षरता केंद्र, यशदा पुणे अंतर्गत राज्यस्तरीय जलसाक्षरता कार्यशाळेचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी डॉ. दिलीप कुलकर्णी, मोहन हिराबाई हिरालाल, यशदाचे कार्यकारी संचालक आनंद पुसावळे व डॉ. सुमंत पांडे उपस्थित होते.
जलसाक्षरतेविषयी जागर, लोकसहभाग आवश्यक
ठळक मुद्देसंडे अँकर । राजेंद्रसिंह राणा, सेवाग्राम येथे जलसाक्षरता कार्यशाळा