व्यापाऱ्याला मारहाण करणारे अटकेत
By Admin | Updated: February 12, 2015 01:28 IST2015-02-12T01:28:42+5:302015-02-12T01:28:42+5:30
येथील एका व्यापाऱ्याचा मध्यरात्रीच्या सुमारास पाठलाग करून मारहाण केल्यानंतर रोख रक्कम व ३ मोबाईल लंपास करणाऱ्या तीन आरोपींना हिंगणघाट पोलिसांनी अटक केली.

व्यापाऱ्याला मारहाण करणारे अटकेत
हिंगणघाट : येथील एका व्यापाऱ्याचा मध्यरात्रीच्या सुमारास पाठलाग करून मारहाण केल्यानंतर रोख रक्कम व ३ मोबाईल लंपास करणाऱ्या तीन आरोपींना हिंगणघाट पोलिसांनी अटक केली.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार ७ फेब्रुवारी २०१५ च्या रात्री एक वाजताच्या दरम्यान ही घटना सिंधी कॉलनीजवळ घडली. फिर्यादी पीतांबर बंसीलाल चंदानी (४७) यांचे पोलीस स्टेशन जवळ दुकान आहे. दररोज रात्री उशिरापर्यंत हिशेब चालतो. नेहमी प्रमाणे त्यांनी ७ फेब्रुवारी रात्री १२.३० नंतर दुकान बंद करून ते मोटारसायकलने घरी जात होते. दरम्यान गुरुनानक वॉर्ड, सिंधी कॉलनी जवळ मोटार सायकलने आलेल्या तीन युवकांनी त्यांना अडविले. लोखंडी रॉड ने त्यांच्या डोक्यावर व हातावर मारहाण करून जखमी केले व त्यांच्या जवळील बॅग हिसकावून पळ काढला. या बॅगमध्ये रोख रक्कम व ३ मोबाईल असा ३५ हजारांचा ऐवज होता. घटनेची तक्रार हिंगणघाट पोलिसांत दाखल करण्यात आली होती.(तालुका प्रतिनिधी)