वर्धा जिल्ह्यात इसमावर चाकूने वार; चव्वाअष्टा खेळण्यातून झाला वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 14:55 IST2019-12-10T14:54:37+5:302019-12-10T14:55:00+5:30
चव्वाअष्टा खेळण्याच्या कारणातून झालेल्या वादात इसमावर चाकूने वार करण्यात आले. ही घटना स्टेशनफैल परिसरात सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली.

वर्धा जिल्ह्यात इसमावर चाकूने वार; चव्वाअष्टा खेळण्यातून झाला वाद
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: चव्वाअष्टा खेळण्याच्या कारणातून झालेल्या वादात इसमावर चाकूने वार करण्यात आले. ही घटना स्टेशनफैल परिसरात सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली.
अर्जुन नरपांडे रा. सुदर्शन नगर असे जखमीचे नाव आहे.
अर्जुन नरपांडे हा त्याचे मित्र सुरज पांडे, सुरज घासले, मेघश्याम भोयर, रवी जामकर यांच्यासोबत निलेश बालमांढरे याच्या घरासमोर चव्वाअष्टा (एक प्रकारचा कवड्या, काचा व लहान दगडाच्या सहाय्याने जमिनीवर चौकोन आखून खेळला जाणारा खेळ) खेळत होता. दरम्यान तेथे छोटू रामटेके हा आला व त्याने मलाही खेळू द्या, असे म्हटले. तेव्हा अर्जुनने सध्या खेळ सुरू आहे तू काही वेळानंतर खेळ असे म्हटले असता रामटेके याने शिवीगाळ केली. दरम्यान काही वेळानंतर विजू नानोटकर आणि अतुल नानोटकर तेथे आले व त्यांनी हातात धारदार शस्त्राने नरपांडेवर वार केले. पार्वती नरपांडे यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसात तक्रार करण्यात आली आहे.