एसडीओंच्या पत्रकाने संभ्रमाचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 05:00 IST2020-07-28T05:00:00+5:302020-07-28T05:00:12+5:30

एसडीओने काढलेल्या परिपत्रकात कोरोना चाचणी कोणत्या पद्धतीने केल्या जाईल याचा स्पष्ट खुलासा नाही. नगरपालिका क्षेत्रात सर्व खासगी वैद्यकीय व्यवसायिक कर्मचारी, औषधी दुकानदार, कर्मचारी, भाजीविक्रेते, दूध विक्रेते, किराणा दुकानदार, इतर दुकानदार, व कामगारांना कोरोना तपासणीचे निर्देश दिले आहे. त्यामुळे संभ्रमाचे वातावरण तयार झालेले आहेत.

An atmosphere of confusion with the SDO sheet | एसडीओंच्या पत्रकाने संभ्रमाचे वातावरण

एसडीओंच्या पत्रकाने संभ्रमाचे वातावरण

ठळक मुद्देडॉक्टरांच्या विविध संघटनेचे निवेदन : कोरोनाना चाचणी संदर्भात मागितला खुलासा

लोकमत न्यूज नेटवर्क
देऊरवाडा/आर्वी : एसडीओ यांनी काढलेल्या परिपत्रकामुळे संभ्रम निर्माण झाला असून कोरोना चाचणी संदर्भात समाधानकारक उत्तर देण्याची मागणी डॉक्टरांच्या विविध संघटनांनी निवेदनातून केली आहे.
यावेळी आर्वी डॉक्टर असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन, इंडियन डेंटल असोसिएशन, इंडियन होमिओपॅथी असोसिएशन,पॅथॉलॉजी असोसिएशन यांनी एकत्र येत यासंदर्भात उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक यांच्याशी चर्चा केली.
एसडीओने काढलेल्या परिपत्रकात कोरोना चाचणी कोणत्या पद्धतीने केल्या जाईल याचा स्पष्ट खुलासा नाही. नगरपालिका क्षेत्रात सर्व खासगी वैद्यकीय व्यवसायिक कर्मचारी, औषधी दुकानदार, कर्मचारी, भाजीविक्रेते, दूध विक्रेते, किराणा दुकानदार, इतर दुकानदार, व कामगारांना कोरोना तपासणीचे निर्देश दिले आहे. त्यामुळे संभ्रमाचे वातावरण तयार झालेले आहेत. वैद्यकीय व्यावसायिकांच्या तपासणीसाठी कुठली पद्धती अवलंब करणार आहे त्यातून चाचणी सकारात्मक किंवा नकारात्मक आल्यास त्याची पुढील कार्यवाही काय राहील याचा खुलासा करण्यात यावा, उपरोक्त चाचणीत आपण सर्वांची सरसकट चाचणी करणार आहे की, ज्यांच्यामध्ये काही प्रमाणात लक्षणे आहेत त्यांची किंवा लक्षणे नसणाऱ्यांची याचा खुलासा करावा,
सर्व वैद्यकीय व्यावसायिकांची व कर्मचाऱ्यांची तपासणी होत नाही तोपर्यंत दवाखाने बंद ठेवावे असे आदेशात नमूद आहे. त्याप्रमाणे सर्व दवाखाने बंद असून खुलासा केल्यावरच योग्य निर्णय घेण्यात येईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदन देताना डॉ. रिपल राणे, डॉ. श्रीकांत देशपांडे, डॉ. उमेश गुल्हाणे, डॉ. दिवाकर ठोंबरे, प्रवीण देशमुख आदींची उपस्थिती होती.

Web Title: An atmosphere of confusion with the SDO sheet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.