शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

अट्टल घरफोड्या पोलिसांच्या हाती

By admin | Updated: July 28, 2014 23:40 IST

पोलिसांना नाकीनऊ आणणाऱ्या अट्टल घरफोड्याला शहर ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी जेरबंद केले. अटकेत असलेल्या आरोपीवर घरफोड्यांसह वाहन चोरीचेही गुन्हे दाखल आहेत.

वाहन चोरीच्या गुन्ह्यातही सराईत : आणखी प्रकरणे उघड होण्याची शक्यता वर्धा : पोलिसांना नाकीनऊ आणणाऱ्या अट्टल घरफोड्याला शहर ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी जेरबंद केले. अटकेत असलेल्या आरोपीवर घरफोड्यांसह वाहन चोरीचेही गुन्हे दाखल आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव प्रफुल्ल गजानन गांगेकर (२५) रा. कोठे ले-आऊट, देवळी असे असल्याचे पोलिसांनी सांगितले. गत काही दिवसांपासून वर्धा शहरामध्ये घरफोडीच्या घटना वाढत होत्या. या चोरट्याचा कुठलाही सुगावा पोलिसांना लागत नव्हता. पोलीस सतत त्याच्या मागावर होते. वारंवार घरफोड्या होत असल्यामुळे वर्धा शहर पोलिसांना घरफोडी करणाऱ्याला पकडण्याचे आव्हानच होते. अशात १९ जुलै रोजी सानेवाडी भागातील नरेश रामसरण यादव यांच्याकडे घरफोडी झाली. त्यामध्ये सात हजार ५०० रुपयाचा माल चोरीस नेला होता.या प्रकाणाचा तपास सुरू असताना गुन्हे अन्वेषण पथकाने खबऱ्यामार्फत माहिती काढून आरोपीचा शोध घेणे सुरू केले. त्यात देवळी येथील सराईत गुन्हेगार प्रफुल्ल गजानन गांगेकर हा सदर घटनेच्या दिवशी घरून आणखी एका सहकाऱ्यास बाहेर असल्याचे समोर आले. या माहितीवरुन पोलिसांनी त्याला देवळी येथे सापळा रचून अटक केली. त्याला पोलीस हिसका दाखविला असता त्याने या गुन्ह्याची कबुली दिली. सोबतच त्याने चंद्रपूर येथून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. या आरोपीकडून आतापर्यंत २९ हजार २०० रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपीला विचारपूस करणे सुरू आहे. त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. प्रफुल गांगेकर हा सराईत घरफोडी व वाहन चोरी करणारा गुन्हेगार असून त्यांने यापुर्वी वर्धा तसेच शहरालगत अत्यंत मोठमोठे गुन्हे केले आहेत. त्याचा साथीदार दीपक बारके हा फरार असून त्याचा शोध घेणे सुरू आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक एम. पी. बुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार ज्ञानेश्वर निशाणे, गजानन लामसे, गजानन गहुकर, आकश चुंगडे, धर्मेन्द्र अकाली, सचिन खैरकार, विशाल बंगाले यांनी केली.(प्रतिनिधी)