अट्टल घरफोड्या पोलिसांच्या हाती

By Admin | Updated: July 28, 2014 23:40 IST2014-07-28T23:40:37+5:302014-07-28T23:40:37+5:30

पोलिसांना नाकीनऊ आणणाऱ्या अट्टल घरफोड्याला शहर ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी जेरबंद केले. अटकेत असलेल्या आरोपीवर घरफोड्यांसह वाहन चोरीचेही गुन्हे दाखल आहेत.

Atal burglar police hand in | अट्टल घरफोड्या पोलिसांच्या हाती

अट्टल घरफोड्या पोलिसांच्या हाती

वाहन चोरीच्या गुन्ह्यातही सराईत : आणखी प्रकरणे उघड होण्याची शक्यता
वर्धा : पोलिसांना नाकीनऊ आणणाऱ्या अट्टल घरफोड्याला शहर ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी जेरबंद केले. अटकेत असलेल्या आरोपीवर घरफोड्यांसह वाहन चोरीचेही गुन्हे दाखल आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव प्रफुल्ल गजानन गांगेकर (२५) रा. कोठे ले-आऊट, देवळी असे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गत काही दिवसांपासून वर्धा शहरामध्ये घरफोडीच्या घटना वाढत होत्या. या चोरट्याचा कुठलाही सुगावा पोलिसांना लागत नव्हता. पोलीस सतत त्याच्या मागावर होते. वारंवार घरफोड्या होत असल्यामुळे वर्धा शहर पोलिसांना घरफोडी करणाऱ्याला पकडण्याचे आव्हानच होते. अशात १९ जुलै रोजी सानेवाडी भागातील नरेश रामसरण यादव यांच्याकडे घरफोडी झाली. त्यामध्ये सात हजार ५०० रुपयाचा माल चोरीस नेला होता.
या प्रकाणाचा तपास सुरू असताना गुन्हे अन्वेषण पथकाने खबऱ्यामार्फत माहिती काढून आरोपीचा शोध घेणे सुरू केले. त्यात देवळी येथील सराईत गुन्हेगार प्रफुल्ल गजानन गांगेकर हा सदर घटनेच्या दिवशी घरून आणखी एका सहकाऱ्यास बाहेर असल्याचे समोर आले. या माहितीवरुन पोलिसांनी त्याला देवळी येथे सापळा रचून अटक केली. त्याला पोलीस हिसका दाखविला असता त्याने या गुन्ह्याची कबुली दिली. सोबतच त्याने चंद्रपूर येथून दुचाकी चोरल्याची कबुली दिली.
या आरोपीकडून आतापर्यंत २९ हजार २०० रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपीला विचारपूस करणे सुरू आहे. त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
प्रफुल गांगेकर हा सराईत घरफोडी व वाहन चोरी करणारा गुन्हेगार असून त्यांने यापुर्वी वर्धा तसेच शहरालगत अत्यंत मोठमोठे गुन्हे केले आहेत. त्याचा साथीदार दीपक बारके हा फरार असून त्याचा शोध घेणे सुरू आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक एम. पी. बुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार ज्ञानेश्वर निशाणे, गजानन लामसे, गजानन गहुकर, आकश चुंगडे, धर्मेन्द्र अकाली, सचिन खैरकार, विशाल बंगाले यांनी केली.(प्रतिनिधी)

Web Title: Atal burglar police hand in

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.