शहद विक्रीतूनही लागतोय उदरनिर्वाहाला हातभार

By Admin | Updated: December 26, 2015 02:14 IST2015-12-26T02:14:21+5:302015-12-26T02:14:21+5:30

ऊस तोडणीच्या कामासाठी तालुक्यात असंख्य मजूर आले आहेत. या कामांतून मिळणारा वेळ व्यर्थ जाऊ नये म्हणून एका ....

Assistance to livelihood by selling honey | शहद विक्रीतूनही लागतोय उदरनिर्वाहाला हातभार

शहद विक्रीतूनही लागतोय उदरनिर्वाहाला हातभार

धडपड जगण्याची : ऊ स तोडणी कामगाराने केला उर्वरित वेळेचा सदुपयोग
विजय माहुरे सेलू
ऊस तोडणीच्या कामासाठी तालुक्यात असंख्य मजूर आले आहेत. या कामांतून मिळणारा वेळ व्यर्थ जाऊ नये म्हणून एका मजुराने थेट शहद (मध) विक्रीचा व्यवसाय अंगिकारला आहे. दररोजच्या चटणी-मिठाला हातभार लागावा म्हणून मजुराने ही धडपड चालविली आहे.
कोटंबा शिवारात ऊस तोडणीवर असलेल्या एका कामगाराने सेलू येथील पंचायत समिती कार्यालयासमोर सहद विकण्यास आणले होते. गावकरी शहद म्हणून अनेकांनी ते घेतले. त्याला नाव विचारले असता सांगितले नाही; पण पुसद जवळील वसंतपूर येथील रहिवासी असून पती-पत्नी दोघेही ऊस तोडणीसाठी आल्याचे समजले. ऊस तोडणीची ‘अ‍ॅडव्हांस’ रक्कम आम्ही दिवाळीतच घेतली. ती खर्च झाली. ऊस तोडणी करताना जनावरांना लागणारा चारा (वाळे) आम्ही विकतो. त्यावर आमचा इथला खर्च भागवित असतो; पण ऊसाच्या सभोवताल मधमाश्याचे पोळे बहुदा सापडतात. त्यामुळे आठवड्यातून एक दिवस ऊस तोडणीतून वेळ मिळताच शहद विक्री करतो. यापासून ३०० ते ४०० रुपये मिळतात. यावर आठवड्याचा तेल-मिठाचा खर्च भागतो. काम करून थकवा येतो; पण हेच दिवस पैसा कमविण्याचे असतात. हा वेळ आपण व्यर्थ घातला तर कसे होणार, असे तो ऊस तोडणी कामगार सांगतो.
शेतमजूर असो वा ऊस तोडणी कामगार, सतत श्रम करीत राहणे, हे त्यांच्या प्रारब्धी आहे. यामुळे जेथून दोन पैसे कमविता येतील व संसाराचा गाडा चालविण्यास मदत होईल, त्यासाठी सातत्याने धडपड सुरू असते. ती जिद्द, चिकाटी आणि त्यांची व्यथा ऐकल्यानंतर जगण्यासाठी सर्व काही हालअपेष्टा झेलाव्या लागतात, हे दिसते. ऊस तोडणी कामगारांना कामावर आणण्यासाठी दिवाळीतच अ‍ॅडव्हांस पेमेंट केले जाते. ऊस तोडणीच्या मजुरीतून दिलेले पैसे कपात केले जातात. यामुळे येथील खर्च भागविण्यासाठी मजुरांची धडपड सुरू असते.

अ‍ॅडव्हांसची रक्कम होते दिवाळीतच खर्च
साखर कारखाने सुरू झाला की, ऊस लागवडीच्या क्षेत्रात वाढ होते. सेलू तालुक्यातही ऊस लागवडीचे क्षेत्र वाढल्याने तोडणीचे कंत्राट दिले जाते. तालुक्यात बहुतांश ऊस तोडणी कामगारांना आधीच अ‍ॅडव्हांस दिला जातो. ही रक्कम कामगारांना दिवाळीपूर्वीच मिळत असल्याने त्यांचा सण साजरा होतो; पण प्रत्यक्ष ऊस तोडणी करीत असताना उदरनिर्वाह करणे अवघड होते. परिणामी, या कामगारांना अन्य पर्याय शोधावे लागतात. असाच मध विक्रीचा पर्याय एका ऊस तोडणी कामगाराने निवडला आहे. ऊसाची तोडणी करीत असताना मधमाशांचे पोळ मिळतात. यातूनच शहद (मध) काढून त्याची विक्री केली जाते.

Web Title: Assistance to livelihood by selling honey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.