शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

आर्वीत कोरोनाचा विस्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 05:01 IST

आतापर्यंत तालुक्यात जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील १७ कोरोना बाधितांची नोंद घेण्यात आली असून त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे शहरात आठ तर ग्रामीण भागात नऊ गावांमध्ये कोरोना रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे. आर्वी तालुक्यात १० मे ते १३ जुलै या दरम्यान एकूण १७ कोरोना रुग्ण आढळले.

ठळक मुद्दे१७ कोरोना रुग्णांची नोंद : कोविड विषाणूने एका महिलेचा घेतला बळी

राजेश सोळंकी ।लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : आर्वी तालुक्यात दोन महिन्यांपूर्वी ग्रामीण भागात चोरपावलांनी शिरकाव केलेल्या कोरोनाने आता हळूहळू शहरी भागातही पाय पसरायला सुरुवात केल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यंत तालुक्यात जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील १७ कोरोना बाधितांची नोंद घेण्यात आली असून त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे शहरात आठ तर ग्रामीण भागात नऊ गावांमध्ये कोरोना रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे.आर्वी तालुक्यात १० मे ते १३ जुलै या दरम्यान एकूण १७ कोरोना रुग्ण आढळले. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. १० मे रोजी जिल्ह्यातील सर्वात पहिला रुग्ण आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा या गावात आढळला. हिवरा तांडा येथील मृत महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तब्बल सात आणि तीन असा एकूण दहा किमीचा परिसर कंटेन्मेंट आणि बफर झोन तयार करून सील करण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच जामखुटा या गावातील तीन व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे १७ मे रोजी पुढे आले. त्यानंतर २२ मे रोजी आर्वी तालुक्यातील रोहणा नजीकचे नागापूर येथे बाहेरून आलेला इसम कोरोनाबाधित आढळला. २५ मे रोजी आर्वी शहरातील पुरुषोमल चौक सिंदी कॅम्प येथे कोरोना बाधित महिला आढळल्याने रुग्ण संख्येत वाढ झाली. सदर महिला ही अकोला येथील आर्वीत दाखल झाली होती. तर वर्धमनेरी येथील तिघांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे ५ जून रोजी पुढे आले. त्यानंतर तब्बल २२ दिवसानंतर २७ जून रोजी आर्वी शहरातील जाजुवाडीत नवीन कोरोना बाधित आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर ५ जुलैला आर्वीचे नगराध्यक्षच कोरोना बाधित निघाल्याने वल्लीसाहेब वॉर्ड सील करण्यात आला.७ जुलैला श्रीराम वार्डातील वयोवृद्ध व्यक्ती, ११ जुलैला नेताजी वार्डातील ४२ वर्षीय व्यक्ती तसेच आर्वी तालुक्यातील नटाला बोथली येथील २२ वर्षीय युवती आणि १२ जुलैला रामदेव बाबा वार्डातील २३ वर्षीय युवक तसेच सोमवारी भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने पुन्हा एकदा तालुक्यात कोरोनाबाबतची दहशत निर्माण झाली आहे. मध्यतंरीच्या काळात आर्वीच्या प्रशासनाने शासकीय कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना बाहेरून येताना १४ दिवस विलगीकरणाबाबतही आदेश पारीत केलेत.दोन महिन्यांत ८,२३६ व्यक्ती गृहविलगीकरणातआर्वी तालुक्यातील एका महिलेचा कोरोनाने बळी घेतला. तालुक्यात मागील दोन महिन्यांच्या काळात ८ हजार २३६ व्यक्तींना होम क्वारंटाईन केले. त्यापैकी ७ हजार २११ व्यक्तींच्या गृहविलगीकरणाचा कालावधी संपला आहे. सध्या हायरिस्कमध्ये ११ तर लो-रिस्क मध्ये २४ व्यक्ती असून त्यांच्यावर आरोग्य विभागाच्या तज्ज्ञांकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. सध्या २४ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात असल्याचे आरोग्य प्रशासनाने सांगितले आहे.निकट संपर्कातील सर्वच निगेटिव्हकोरोना बाधिताची नोंद घेतल्यानंतर त्या व्यक्तीच्या निकट संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचे स्वॅब तपासणीला पाठविण्यात आले. पण कोरोना बाधिताच्या निकट संपर्कात आलेल्या सर्वच व्यक्तींचे अहवाल आतापर्यंत निगेटिव्ह आले आहेत.आठ परिसर झाले सीलकोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून क्लस्टर कंटेन्मेंट कृती आराखडा अंमलात आणून आर्वी शहरातील पुरुषोमल चौक सिंधी कॅम्प, जाजुवाडी परिसर, वल्ली साहेब वार्ड, श्रीराम वार्ड, नेताजी वार्ड, रामदेव बाबा वार्ड, शासकीय कर्मचारी निवासस्थान (नेताजी चौक )सील केले होते.तीन वेळा संचारबंदीआर्वीत मागील दोन महिन्यांच्या काळात एकूण तीन वेळा सक्तीची संचारबंदी लागू करून नागरिकांना जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. या जनता कर्फ्यूला नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, मात्र रुग्णसंख्या वाढतच आहे.नागरिकांनी स्वत:ला कोरोनामुक्त ठेवण्यासाठी वेळोवेळी हात धुवावे, घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा. शिवाय गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. कुठल्याही परिस्थितीत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.- हरिष धार्मिक, उपविभागीय महसूल अधिकारी, आर्वी.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या