आर्वीच्या आमदारांकडून कृषी अधिकाऱ्यांची कानउघाडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 06:00 IST2019-12-18T06:00:00+5:302019-12-18T06:00:13+5:30

तत्काळ मदत वाटप करा अन्यथा नागपूर अधिवेशनात प्रश्न उपस्थित करू अशी तंबीच यावेळी आ. केचे यांनी अधिकाऱ्यांना दिली. आर्वी विधानसभा क्षेत्रातील आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यात अतिवृष्टी झाली. परंतु, अत्यंत कमी नुकसान झाल्याचे अधिकाऱ्यांनी दाखविल्याची ओरड शेतकरी करीत आहेत. कारंजा तालुक्यात नुकसान झालेच नसल्याचे अहवालात नमूद आहे; पण वास्तविकता वेगळीच आहे.

Arvie MLA to agricultural officials | आर्वीच्या आमदारांकडून कृषी अधिकाऱ्यांची कानउघाडणी

आर्वीच्या आमदारांकडून कृषी अधिकाऱ्यांची कानउघाडणी

ठळक मुद्देनुकसानग्रस्तांना मदत न देणे भोवले : विधानसभेत मांडणार प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : आर्वी विधानसभा मतदार संघातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत न मिळाल्याबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल घेत आर्वीचे आ. दादाराव केचे यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यावेळी उपविभागीय अधिकारी, कृषी अधिकारी, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी आदींची चांगलीच झाडाझडती आ. केचे यांनी घेतली.
तत्काळ मदत वाटप करा अन्यथा नागपूर अधिवेशनात प्रश्न उपस्थित करू अशी तंबीच यावेळी आ. केचे यांनी अधिकाऱ्यांना दिली. आर्वी विधानसभा क्षेत्रातील आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यात अतिवृष्टी झाली. परंतु, अत्यंत कमी नुकसान झाल्याचे अधिकाऱ्यांनी दाखविल्याची ओरड शेतकरी करीत आहेत. कारंजा तालुक्यात नुकसान झालेच नसल्याचे अहवालात नमूद आहे; पण वास्तविकता वेगळीच आहे. शेतकऱ्यांच्या लेखी तक्रारीकडेही अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने या बैठकीत अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी करण्यात आली.

आर्वी विभागात झालेल्या शेती नुकसानीचा गोषवारा तयार करण्यात आला आहे. तो वरिष्ठांकडे सादर करण्यात आला. १.३५ कोटींच्या नुकसान निधीची मागणी केली आहे. तसा जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर केला असून त्यांनी तो शासनाकडे पाठविला आहे.
- हरीश धार्मिक, उपविभागीय महसूल अधिकारी, आर्वी.

Web Title: Arvie MLA to agricultural officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.