शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

आर्वी तालुका कोरोनाचा नवा ‘हॉटस्पॉट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 05:00 IST

रामदेवबाबा वॉर्डातील युवकाच्या निकट संपर्कातील १४ नमुने ११ जुलैला तपासणीकरिता पाठविण्यात आले होते. त्यापैकी पाच नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यात कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेले ५९ व ४९ वर्षीय दोन काका, ५८ व ४० वर्षीय दोन काकू आणि वीस वर्षीय युवक कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले.

ठळक मुद्देरामदेवबाबा वॉर्डात आढळले पाच पॉझिटिव्ह : रुग्णसंख्या पोहोचली २१ वर; एकाचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : येथील रामदेवबाबा वॉर्डातील २३ वर्षीय युवकाचे निकट संपर्कातील पाच जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आर्वीला कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. आतापावेतो २१ जणांना कारोनाची बाधा झाली तर यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे.रामदेवबाबा वॉर्डातील युवकाच्या निकट संपर्कातील १४ नमुने ११ जुलैला तपासणीकरिता पाठविण्यात आले होते. त्यापैकी पाच नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यात कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेले ५९ व ४९ वर्षीय दोन काका, ५८ व ४० वर्षीय दोन काकू आणि वीस वर्षीय युवक कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले.या सर्व रुग्णांना सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज पावेतो एकच रुग्ण पॉझिटिव्ह होता, तर सर्वच निकट संपर्कातील व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र मंगळवारी पाच कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.दोन दिवस संचारबंदी असून रस्त्यावर निरव शांतता आहे. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, आरोग्य विभाग, पोलिस प्रशासन, नगरपालिका प्रशासन, महसूल विभाग सर्वतोपरी खबरदारी घेत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे व नियमांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांनी केले आहे.बाधित कुटुंबाच्या घराचा परिसर सीलरामदेवबाबा वॉर्डातील कोरोनाबाधित रुग्णाच्या घरासभोवतालचा परिसर सील करून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हे पाच रुग्ण आणखी कुणाच्या संपर्कात आले, याचा आरोग्य, महसूल विभागाकडून शोध घेतला जात असून सर्व संबंधित लोकांना क्वारंटाईन करण्याचे कार्य सुरू आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या