शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
2
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
3
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल अयशस्वी, तुर्कीचे ड्रोन पाडले"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
4
'आमचे इस्लामिक सैन्य, आमचे कामच जिहाद', पाकिस्तानी लष्करप्रमुखाचा व्हिडिओ व्हायरल...
5
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
6
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...
7
ड्रोन बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं 3 दिवसांत दिला 37% परतावा, 500 रुपयांवर पोहोचला शेअर
8
शाहरुख खानसोबत ३० वर्षांनी दिसणार 'हा' एव्हरग्रीन अभिनेता, 'किंग' सिनेमात झाली एन्ट्री
9
घराबाहेर पडताना आई तुम्हाला आवर्जून दही-साखर देते का? फायदे समजल्यावर रोजच मागाल
10
काय होता ५००० कोटींचा 'पॅनकार्ड' इनव्हेस्टमेंट फ्रॉड? ५१ लाख गुंतवणूकदारांना घातला गंडा
11
पाकिस्तानचा शेअर बाजार अचानक १ तास करावा लागला बंद! युद्धविरामनंतर नेमकं काय घडलं?
12
'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ
13
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!
14
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
15
जग कधीच विसरू शकणार नाही विराट कोहलीचे हे 10 कसोटी विक्रम; कुण्याही भारतीयाला जमला नाही असा पराक्रम
16
"मी विराटचे अश्रू पाहिलेत..."; 'किंग कोहली'च्या कसोटी निवृत्तीनंतर अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट
17
स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर प्रतीकला दत्तक घेणार होती बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध जोडी! अभिनेत्याचा मोठा खुलासा 
18
'युद्ध रोमँटिक चित्रपट नाही, गंभीर मुद्दा आहे', माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे सूचक विधान
19
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
20
सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे ठेवूनही मिळेल FD इतकं व्याज; फक्त करावं लागेल 'हे' महत्त्वाचं काम

महागड्या कारने येत जबरी रोकड पळविणारे अखेर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2022 05:00 IST

राजू रवी राऊत हे एम. एच. ३६ ए. ए. १९८५ क्रमांकाच्या मालवाहूने नियोजित ठिकाणी पाच बैल घेऊन जात होते. मालवाहू जाम चौरस्ता परिसरात आला असता मागाहून आलेल्या कारमधील काही व्यक्तींनी मालवाहू थांबवून वाहनातील चालक व क्लिनरला मारहाण केली. इतकेच नव्हे तर धाकदपट करीत त्यांच्या जवळील ८ हजार रुपये हिस्कावून घेतले. आरोपी इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी बैल व मालवाहू हवा असेल तर बैल मालकास तातडीने ऑनलाईन पैसे पाठवायला सांगण्याचे सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : महागड्या कारने येत गोवंशाची वाहतूक करणाऱ्या मालवाहूला अडवून मारहाण करीत जबरी रोकड पळविणाऱ्या त्रि-सदसीय चोरट्यांच्या टोळीला समुद्रपूर पोलिसांनी अटक केली आहे. गोलू ऊर्फ शैलेश बहादूर राणा, श्रीकांत रमेश हेडाऊ व अमरदीप ऊर्फ बॉब अरुण जीवने सर्व रा. हिंगणघाट अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.राजू रवी राऊत हे एम. एच. ३६ ए. ए. १९८५ क्रमांकाच्या मालवाहूने नियोजित ठिकाणी पाच बैल घेऊन जात होते. मालवाहू जाम चौरस्ता परिसरात आला असता मागाहून आलेल्या कारमधील काही व्यक्तींनी मालवाहू थांबवून वाहनातील चालक व क्लिनरला मारहाण केली. इतकेच नव्हे तर धाकदपट करीत त्यांच्या जवळील ८ हजार रुपये हिस्कावून घेतले. आरोपी इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी बैल व मालवाहू हवा असेल तर बैल मालकास तातडीने ऑनलाईन पैसे पाठवायला सांगण्याचे सांगितले. घाबरलेल्या मालवाहू चालकाने बैल मालकास माहिती दिल्यावर ऑनलाईन पद्धतीने आरोपीस १७ हजार रुपये देण्यात आले. आरोपींच्या तावडीतून कशीबसी सुटका झाल्यावर राजू राऊत याने समुद्रपूर पोलीस स्टेशन गाठून तक्रार नाेंदविली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेत तपासाला गती देत अवघ्या काही तासांतच या चोरट्यांना हुडकून काढत अटक केली. चोरट्यांकडून पोलिसांनी एम. एच. १८ ए. जे. ९७९७ क्रमांकाची महागडी कारही जप्त केली आहे. ही कारवाई ठाणेदार प्रशांत काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक पंकज मसराम, पोलीस अंमलदार अरविंद येनुरकर, विक्की मस्के, रवी पुरोहित, वैभव चरडे यांनी केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस