दहशत पसरविणाऱ्या युवकाला अटक
By Admin | Updated: February 2, 2017 00:43 IST2017-02-02T00:43:51+5:302017-02-02T00:43:51+5:30
कारला चौक भागातील अवतार शॉपिंग कॉम्प्लेक्स परिसरात चाकूचा धाक दाखवित नागरिकांमध्ये दहशत

दहशत पसरविणाऱ्या युवकाला अटक
चाकू जप्त : कारला चौकातील घटना
वर्धा : कारला चौक भागातील अवतार शॉपिंग कॉम्प्लेक्स परिसरात चाकूचा धाक दाखवित नागरिकांमध्ये दहशत पसविणाऱ्या युवकाला रामनगर पोलिसांनी जेरबंद केले. ही कारवाई मंगळवारी रात्री करण्यात आली. गुड्डू उर्फ राजेंद्रसिंग लखनसिंग जुनी (२४) रा. हनुमानगढ कारला चौक, असे आरोपीचे नाव आहे.
पोलीस सुत्रांनुसार, कारला चौक भागातील अवतार कॉम्प्लेक्स परिसरात एक २४ ते २५ वर्षीय युवक हातात चाकू घेऊन ये-जा करणाऱ्यांना शिवीगाळ करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सदर युवक चाकूच्या धाकावर व्यावसायिकांना दुकाने बंद करण्यासाठी धमकावत असल्याचेही सांगण्यात आले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पोलीस पथकाने मोठ्या शिताफीने दहशत पसरवित असलेल्या युवकाला ताब्यात घेत त्याच्या जवळून एक चाकू जप्त केला.
पोलिसांनी अधिक विचारणा केली असता युवकाने आपले नाव गुड्डू उर्फ राजेंद्रसिंग लखनसिंग जुनी (२४) रा. हनुमानगढ कारला चौक, असे सांगितले. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी आरोपीविरूद्ध भारतीय हत्यार बंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.(शहर प्रतिनिधी)