‘त्या’ आरोपींना अटक करा; मागणी
By Admin | Updated: November 29, 2014 02:01 IST2014-11-29T02:01:11+5:302014-11-29T02:01:11+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल एका समाजकंटकाने अपमानास्पद मजकुर प्रसिद्ध करून डॉ. आंबेडकरांची विटंबना केली़ यामुळे ....

‘त्या’ आरोपींना अटक करा; मागणी
आष्टी (श.) : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल एका समाजकंटकाने अपमानास्पद मजकुर प्रसिद्ध करून डॉ. आंबेडकरांची विटंबना केली़ यामुळे आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या़ जवखेडा येथे दलित कुटुंबाची हत्या झाली़ या दोन्ही घटनांचा डॉ. आंबेडकर स्मारक समिती, बहुजन समाज पार्टी व वडार समाजाने निषेध नोंदविला़ यातील आरोपींना अटक करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली़
समाजात तेढ निर्माण करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकाला रा.सु.का. खाली अटक करून कठोर शिक्षा करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली़ जवखेडा येथील एका दलित कुटुंबातील तीन व्यक्तींची अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या केली़ हे मारेकरी अद्यापही मोकाट आहेत़ शासनाला अद्यापही मारेकरी सापडलेले नाहीत. यातील मारेकऱ्यांना त्वरित अटक करून कठोर कारवाई करावी व जाधव कुटुंबातील आपत्तीग्रस्तांना योग्य नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही निवेदनातून केली़ वडार समाज हा मागास असून भटकी जमात आहे. या समाजातील लोक अशिक्षीत असून कष्ट करून जगत आहे़ वर्धा येथील वडार समाजातील रूपेश मुळे या मुलाचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या तीनही घटनांतील आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भीमराव गवळी, बहुजन समाज पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते नारायण मात्रे, वडार समाजाचे नारायण कलोडे यांनी निवेदनातून केली़(प्रतिनिधी)