आरोपीच्या आई-वडिलाला अटक करा
By Admin | Updated: August 4, 2016 00:30 IST2016-08-04T00:30:38+5:302016-08-04T00:30:38+5:30
: माजी जि.प. सभापती छत्रपती थुटे यांना मारहाण केल्यानंतर आरोपी गावात येऊन ‘छत्रपतीचा खून केला’, असे सांगत होते.

आरोपीच्या आई-वडिलाला अटक करा
थुटे हत्या प्रकरण : नागरिक, नातलगांची मागणी
समुद्रपूर : माजी जि.प. सभापती छत्रपती थुटे यांना मारहाण केल्यानंतर आरोपी गावात येऊन ‘छत्रपतीचा खून केला’, असे सांगत होते. त्या आरोपीचे आई-वडीलही धमकी देत होते. यामुळे आरोपीचे आई-वडीलही जबाबदार आहे. त्यांनाही सहआरोपी करून अटक करावी, अशी मागणी नागरिक व नातलगांनी केली. ठाणेदारामार्फत पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले.
१६ जुलै रोजी थुटे यांची हत्या करण्यात आली. यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवित स्वप्नील व हर्षल वाणे यांना अटक केली. २५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिल्यानंतर दोघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. यातील एका आरोपीला अद्याप अटक झालेली नाही. तत्पूर्वी आरोपीने घटनेनंतर सावरखेडा गावात, ‘छत्रपतीचा खून केला, पुन्हा कुणी मधे याल तर तुमचीही तीच गत होईल, असे सांगितले. यावेळी त्याचे आई-वडीलही सोबत होते. थुटे कुटुंबीयांनाही धमकी देत गावात दहशत निर्माण केली. आरोपीच्या आई वडिलांच्या चिथावनीमुळेच असे कृत्य केले. तेव्हा त्यांना सहआरोपी करून त्वरित अटक करावी, अशी मागणी करण्यात आली.(तालुका प्रतिनिधी)