शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

आत्माच्या लेखापालास २५ हजाराची लाच घेताना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 23:31 IST

प्रकल्प संचालक आत्मा आर्वी नाका वर्धा येथील कार्यालयात कार्यरत लेखापाल क्षितीज रवी जाधव (२९) याच्यासह आनंद श्यामलाल चिमनाणी या दोघांना २५ हजार रुपयांची रोख रक्कम स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वर्धाच्या पथकाने रंगेहात पकडले.

ठळक मुद्देरुरल मॉलमधील दुरूस्तीच्या कामाचे देयक काढण्यासाठी मागितले पैसे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : प्रकल्प संचालक आत्मा आर्वी नाका वर्धा येथील कार्यालयात कार्यरत लेखापाल क्षितीज रवी जाधव (२९) याच्यासह आनंद श्यामलाल चिमनाणी या दोघांना २५ हजार रुपयांची रोख रक्कम स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वर्धाच्या पथकाने रंगेहात पकडले. या घटनेमुळे कृषी विभागाच्या कार्यालयातील भ्रष्टाचार उजेडात आला आहे.उस्मानाबाद येथील मुळ रहिवासी असलेले क्षितीज रवी जाधव हे आत्मा प्रकल्प कार्यालयात लेखापाल पदावर कार्यरत होते. त्यांनी तक्रारकर्त्या इसमाला रेल्वे स्टेशन परिसरातील रुरल मॉल दुरूस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे ८० हजार रुपयांचे बील काढण्यासाठी धनादेश तयार करून देण्याच्या कामाकरिता ४० हजार रुपयाची मागणी केली होती, व ही रक्कम आनंद श्यामलाल चिमनानी (३५) रा. संत कंवरराम धर्मशाळा, रामनगर वर्धा यांच्यामार्फत स्विकारण्याची तयारी दाखविली होती. या प्रकरणी तक्रारकर्त्या इसमाने लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे वर्धा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर गुरुवारी सापळा रचून २५ हजार रुपये रोख व १५ हजार रुपयांचे धनादेश स्विकारताना जाधव व चिमनाणी या दोघांनाही रंगेहात पकडले. आरोपीविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई नागपूर येथील पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक राजेंद्र दुधलकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब गावडे, पोलीस निरीक्षक सुहास चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बावनेर, रोशन निंबोळकर, अतुल वैद्य, सागर भोसले, कैलास वालदे, विजय उपासे, हरिदास खडसे, दिलीप कुचनकर, अर्पण गिरजापुरे, स्मीता भगत, श्रीधर उईके यांनी पार पाडली.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचार