उड्डाण पुलाच्या विस्तारीकरणास मंजुरी
By Admin | Updated: March 15, 2015 01:59 IST2015-03-15T01:59:51+5:302015-03-15T01:59:51+5:30
शहरातील वाहतुकीची कोंडी करणारा आचार्य विनोबा भाव उड्डाण पूल अनेक वर्षांपासून रूंदीकरणाच्या प्रतीक्षेत होता़ या पुलाच्या रूंदीकरणाचा प्...

उड्डाण पुलाच्या विस्तारीकरणास मंजुरी
वर्धा : शहरातील वाहतुकीची कोंडी करणारा आचार्य विनोबा भाव उड्डाण पूल अनेक वर्षांपासून रूंदीकरणाच्या प्रतीक्षेत होता़ या पुलाच्या रूंदीकरणाचा प्रश्न मार्गी लागला आहे़ या पुलाच्या रूंदीकरणासाठी ४५ कोटींची प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली़ पुलाचे रूंदीकरण झाल्यास शहरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे़
केंद्रीय मार्ग परिवहन मंत्रालयाने ६ फेब्रुवारी रोजी रोजी काढलेल्या पत्रकानुसार आरडब्यू/एनएच-२८९१४ /१/२०१४-एमएएच (पी-६) वर्धा येथील बजाज चौक उड्डान पूल विस्तारीणाला ४५ कोटीची रुपये प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे़ याबाबत खासदार रामदास तडस यांनी २४ जुलै २०१४ रोजी अतारांकित प्रश्न लोकसभेत उपस्थित केला होता़ शिवाय केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे वेळावेळी पाठपुरावा करून नवी दिल्ली येथे संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती़ नितीन गडकरी व पंंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रलंबित बजाज चौकातील उड्डान पुलाचा प्रश्न मार्गी लावला़ परिणामी, अनेक दिवसांपासून केंद्र शासनाकडे प्रलंबित असलेली ३५ कोटींची प्रशासकीय मान्यता सुधारीत करून ४५ कोटी रुपये केंद्र शासनाने मंजूर केली आहे़ केंद्र शासनाच्या पत्रानुसार ४ महिन्यांच्या आत तांत्रिक मान्यता प्राप्त करून घेणे गरजेचे आहे़ यासाठी खासदार तडस यांनी मुख्यमंत्री तसेच मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नागपूर यांना २ फेब्रुवारी रोजी पत्र देत तांत्रिक मान्यता त्वरित देण्याची विनंती केली़ पूल रुंदीकरणामुळे वाहतूक सुरळीत होणार आहे़(कार्यालय प्रतिनिधी)
प्राकलन, मान्यता, नेमणूक आदी कामे जूनपर्यंत पूर्ण होणार
उड्डाण पुलाच्या रूंदीकरणास मंजुरी मिळाल्यानंतर आता पूढील प्रक्रिया जून २०१५ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे़ यात कन्सल्टंसी नेमणे, रेल्वेचा जीएडी स्टडी रिपोर्ट देणे, त्यांची मंजूरी घेणे, प्राकलन तयार करून मान्यता घेणे, निवीदा प्रक्रिया सुरू करणे आदी बाबींचा समावेश आहे़ यासाठी २४ मार्च रोजी विभागीय प्रबंधक नागपूरचे संबंधित अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यासोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे़
वर्धा जिल्ह्यातील महत्त्वाचा बजाज चौकातील उड्डाण पूल त्वरित बांधकाम सुरू करण्याच्या प्रक्रियेला गती प्राप्त होणार आहे़
वर्धा शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी महत्त्वाचा असलेला बजाज चौकातील उड्डाण पूल रूंद करणे गरजेचे होते़ केंद्र शासनाची प्रशासकीय मान्यता मिळाल्याने हा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे़ ४५ कोटींची मंजुरी केंद्र शासनाने दिली असून उर्वरित प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे़ ही कामे जलद व्हावी म्हणून २४ मार्च रोजी नागपूर येथे अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे़
- खा़ रामदास तडस, वर्धा़